AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग १
(बस्स! नाम ही काफी है!)
AMK-प्रत्येक सह्यवेड्याने आयुष्यात एकदातरी करावा असा ट्रेक. Trekkers ची पंढरीही म्हंटलं जातं याला, असा हा ट्रेक. ज्यामध्ये सगळं काही आहे. Full package. गेल्या एक वर्षापासून ज्या ट्रेक ची वाट बघत होते तो finally आपल्या ट्रेक क्षितिज संस्थेच्या schedule मध्ये दिसला आणि काय आनंद झाला म्हणून सांगू (या आधीही होता तो ट्रेक schedule मध्ये पण जाणं झालं नाही). यावेळी काहीही करून करायचाच असंच ठरवलं होतं. तरीही नाव द्यायचं राहूनच गेलं आणि जेव्हा दिलं तेव्हा waiting list मध्ये ८,९,१० नं. होता(मी, सोनम आणि अक्षता). मग जेव्हा प्रणोती चा message आला कि सीट confirm झाल्यात तेव्हा ग्रुप मध्ये add झालो. पण आमच्या त्रिकुटातलं एक कुट कमी झालं होतं 😜(सोनम). तब्येत ठीक नसल्यामुळे.
मग finally तो निघायचा दिवस आला (Actually रात्र). डोंबिवली ला नेहमीच्या ठिकाणी भेटायचं होतं. सगळ्यात आधी पोहचले म्हणून टिळकांच्या पुतळ्यावर लक्ष ठेवायचा आणि त्यांना company द्यायचा सल्ला मिळाला group वर😜😁. जेवण करून(आणि राहिलेला Schezwan Fried Rice parcel घेऊन--खपवण्यासाठी 😁😝) bus जवळ पोहोचले तेव्हा ट्रेक members ऐवजी आम्हाला सोडायला आलेले members च जास्तं दिसत होते. सगळ्यांचा निरोप घेऊन, बाप्पाचं नाव घेऊन, मग finally bus🚌 निघाली. सगळे गाढ झोपेत असताना, वाटेत कसारा घाटाच्या आधी चहा साठी बस थांबली "बाबा च्या धाब्यावर". चहा-कॉफी घेऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली.
रात्री ३:३० च्या आसपास आंबेवाडी गावात पोहोचलो (वेळ चुकली असेल तर कळवा). लाखन च्या अंगणात झोपायला बरीच जागा होती. थंडी खुउउउप (बेक्क्क्कार😖😖😜)होती. सगळ्यांनी आपापल्या bags खाली ठेऊन पथारी टाकायला घेतली. आम्हीपण Mat टाकली आणि पांघरून घेऊन पडलो. Mat वर पडल्यावर, वर जे दृश्य दिसलं, त्याला तोड नाही. संपूर्ण आकाश एकदम clear आणि चांदण्यांनी खचाखच भरलेलं🌌🌠. IMAX चा ३D इफेक्ट सुद्धा फिका वाटला मला त्याच्यापुढे. कितीतरी वेळ फक्त ते बघण्यातच गेला. अक्षरशः हरवुन गेल्यासारखं वाटलं त्या जगात क्षणासाठी. कधी बघायला मिळतं आपल्याला हे दृश्य रोजच्या आयुष्यात? त्या शांततेत Rumi चे काही quotes आठवले तेव्हा.
“silence is the language of god,
all else is poor translation.”
---
“The breezes at dawn have secrets to tell you
Don't go back to sleep!
You must ask for what you really want.
Don't go back to sleep!
People are going back and forth
across the doorsill where the two worlds touch,
The door is round and open
Don't go back to sleep!”
---
“Only from the heart can you touch the sky.”
चांदण्या बघून झाल्यावर जरा झोपावं म्हंटलं. कारण पहाटे ५:०० वा. परत उठायचं होतं. sleeping बॅग वाल्यांनी एव्हाना घोरायलासुद्धा 😴😴 सुरुवात केलेली. पण आम्हाला काही झोप लागेना. इतकी थंडी होती. अक्षता थोडा वेळ का होईना, पण झोपलेली. बाकीच्यांचं माहित नाही पण मी आणि पराजक्ता 😜😁 तर जागेच होतो. कुडकुडत होतो थंडीने. कूस बदलण्यातच ५ वाजले आणि मग प्रातःविधी उरकायची सुरुवात झाली. सारं आवरल्यावर चुलीजवळ जाऊन बसलो. रात्रभर थंडीत मेल्यावर उबेची किंमत काय असते हे चुलीजवळ बसल्यावर समजलं 😁😁. मग चहा ☕️आणि पोह्यांचा♨️ नाश्ता झाला. खूप भूक लागलेली त्यामुळे २ वेळा हाणले😜. त्यानंतर सामानाचं वाटप झालं. माझ्याकडे चहाचं सामान दिलं गेलं. काहींनी बाकीचं जेवणाचं सामान घेतलं. काहींना Helmet आणि Harness carry करायला देण्यात आलं. मग सगळ्यांनी bags आवरल्या आणि intro चा राऊंड झाला. Intro झाला, group photo झाला आणि मग आम्ही आमच्या ध्येयाकडे चालू लागलो.
भाग -१
-समाप्त -
-भारती दळवी.














