Tuesday, February 28, 2017

Chadar Trek. एक स्वप्नं...

Chadar Trek
एक स्वप्नं...

भाग-१



          जगातील One Of The Most Difficult & Adventurous Trek म्हणून प्रसिद्ध असलेला असा हा trek. पूर्वी हिवाळ्यात जेव्हा लदाखमध्ये बर्फवृष्टी 🌨❄️❄️(Snowfall) होत असे तेव्हा रस्ते बंद झाल्यावर झन्स्कारी लोक या मार्गाचा वापर करत. हा मार्ग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून झंस्कार नदीचं गोठलेलं पात्रं. तापमान उणे(-)४०°C पर्यंत खाली येतं 😱😅नदीवर बर्फाची चादर तयार होते त्यामुळे याला Chadar trek म्हणतात. याबद्दल मी अधिक माहिती देण्यापेक्षा तुम्ही Google केलेलंच बरं.😜

         २०१४ पासून list मध्ये add झालेला हा trek😅. पण पुढच्या वर्षी म्हणत म्हणत राहून गेलेला. २०१६ ला सुद्धा जायचा काही plan नव्हता. पण या सगळ्याला सुरुवात झाली ती २० डिसेम्बर २०१६ ला. पराजु जातेय हे तर माहित होतंच पण आणखी एक व्यक्ती भेटली जी जात होती. मनात आलं, 🤔साला मी का नाही जात आहे. पुढच्या वर्षी कोणाला माहित काय होईल. आणि अचानक ठरलं यावेळी काही करून करायचाच😈. पराजुला call केला, ती म्हंटली चल माझ्याबरोबर. मग म्हंटलं आता जायलाच पाहिजे😜. तीनेपण same batch साठी Trek co-coordinator ला विचारलं😊. मी अक्षताला म्हंटलं आपण chadar ला जातोय यावेळी😛. ती तयार होती पण अक्कीच्या नशिबात नव्हतं यावेळी बहुतेक😁. मग मी आणि पराजु अशा दोघीच होतो आता चादरला. मध्ये बरीच संकटं आली पण पारसुद्धा झाली😅. घरी सांगायचं अजून सगळ्यात मोठं काम बाकी होतं😓. आईला कल्पना दिली या सगळ्याबद्दल आणि 2 Jan. ला आधी ✈️विमानाचं तिकीट book केलं आणि मग ४ तारखेला Trek Book  केला😛. आणि मग चालू झाली सामानाची जमवाजमव. अक्कीने माझी Thermals, Gloves आणि झोपताना लागणाऱ्या Socs ची सोय केली. 👷जेधे साहेबांनी ६० लिटर RUCKSACK ची सोय केली. राहिलेलं सामान बोरिवली ला MSA मधून घेतलं.





          सगळी तयारी झाली होती👍🏽. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. २३ तारखेपासून तिकडे खूपच बर्फवृष्टी 🌨❄️❄️ (Snowfall तोपण Heavy वाला) चालू आहे हे समजलं. ट्रेकच्या start point च्या अलीकडे भूस्खलन (Landslide) झालं होतं. Leh ला जाणाऱ्या सगळया Flights cancel झाल्या होत्या😑. ट्रेकला गेलेली मंडळी अडकून पडली होती😶. आणि trek बंद करण्यात आला होता🙁. हे सगळं FB वर समजलं. सगळ्यात आधी जाऊन आमच्या trek dates (३१ ते ८) च weather forecast बघितलं😅आणि आधीचे २ दिवस ☀️ Sunny Day बघून बरं वाटलं. मनात म्हटलं एक दिवस जरी चादर वर पाय ठेऊन आलो तरी बस्स आहे😛. (सूचना: इथून पुढे प्रा. म्हणजे प्राजक्ता😛) प्रा. ला मधे भेटले पण तिला या सगळ्या बद्दल काही सांगितलं नाही. तिला Negativity आवडत नाही म्हणून🙄😜. आणि तिला देखील Flights बद्दल माहित होतं पण तिने मला सांगितलं नाही😅.


मुंबई विमानतळ Arrival gate
           😄 शेवटी ३१ जानेवारी उजाडलं. आदल्या रात्री ४ वाजेपर्यंत packing च चालू होतं😅RUCKSACK पाठीला लावली आणि मनात वेडी आशा घेऊन निघाले दुपारी पुण्यातून 🚌. माझी रात्री ११ वा. ची Flight होती आणि प्रा. ची ३ वाजता ची. मुंबईला विमानतळावर Baggage Check in करत असतानाच प्रा. चा call आला. थांब😟Check in नको करुस. मी काय सांगतेय ते नीट ऐक👂🏼. तिला संजय सरांनी तिथल्या परिस्थिती बद्दल सांगितलं होतं. ते तिने मला सांगायला सुरुवात केली आणि म्हंटली, बघ तुला decision घ्यायचाय. मी म्हंटलं, हे सगळं एक आठवडा झाला माहितीये तरीसुद्धा मी आता इथे उभी आहे 😛. इथून परत जाणं केवळ अशक्यं😑. एक दिवस का होईना पाय ठेऊन यायचंय आणि नाहीच झाला trek सुरु तर नुसतंच Leh फिरून परत येईन😜. मग काय, ती माझीच बहीण😝😘. म्हंटली, तू हो पुढे मी आलेच. झालीच Leh ची flight cancel तर दिल्ली फिरू किंवा Spiti Valley ला जाऊ. तिने तर पुढचा plan पण बनवला🙆खुउउउउउउउप भारी वाटतं असं आपल्यासारखं कोणी वेडं असलं की🤡भेटू दिल्लीला आणि पुढचं ठरवू बोलून फोन ठेवला आणि मी निघाले विमानात बसायला😁💃

दिल्ली विमानतळ


          आयुष्यातला पहिला विमान प्रवास पण अजिबात कुतूहल वाटत नव्हतं कारण माझ्यासाठी आम्ही घेतलेला निर्णय हा एक वेगळाच Take Off होता😁. पुरतं खाल्लं त्याने विमानाच्या Take Off ला. ११.३० ला दिल्लीला उतरले. आमच्या लेह च्या flights cancel तर नव्हत्या झाल्या पण postpone झालेल्या😅. पण अचानक प्रा.ची flight Preponed झाली आणि तीला 🏃🏽धावत-पळतच लेह ची flight board करावी लागली. तिथेपण एक गोंधळ😝. असो. आम्ही एकदाचं लेह ला पोहचलो. लेह ला जाताना जर Window seat मिळाली तर नशीबवानच म्हणायचं(जी मी नव्हते😑कारण वरून जे पर्वतरांगांचं 🗻🗻दृष्य दिसतं त्याला तोड नाही. असो. आम्ही ३०°C  वरून उणे तापमानात प्रवेश केला. प्रा. उतरली तेव्हा -१२°C 😬आणि मी उतरले तेव्हा -८°C तापमान होतं. अगदी छोटं आहे विमानतळ पण त्याच्या सभोवतालचं दृष्य अप्रतिम आहे. बर्फाने नटलेले डोंगर, पर्वत आपल्यासाठी नवीनच. लेह ला एकदाचं भेटलो आणि निघालो Hotel Palace View कडे. 



लेह विमानतळाच्या शेजारचा परिसर 

भाग-१
--समाप्त--

Thursday, February 16, 2017

भरारी



भरारी


आस भरारीची उरी घेऊनी,
अखेर पंख मी पसरले.
घेतला वाऱ्याचा वेग अन्,
अडसर मागे सरले.


साथ कुणाची असो-नसो,
आता संकोच मी विसरले.
भावनांच्या हिंदोळ्यांवरही ,
मनं हे माझे तरले.

ऐकुनी आवाज अंतरीचा, 

विस्मृतीतील स्वप्नं स्मरले. 
आता अशक्य मागे वळणे,
एकंच ध्येयं, स्वतःशी ठरले.

कातं टाकली जुनेपणाने,
अन् स्वप्नं उराशी धरले.
झेपावले आभाळात मन,
आता माझे ना काही उरले .

-स्वछंद.