Friday, March 24, 2017

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-4

Chadar Trek 
एक स्वप्नं... 

भाग-४




दुसरा दिवस:
४ फेब्रुवारी २०१७: Tilat-Do ते Shingra Koma, १२.५ कि.मी, ५ तास. 


७ वाजता उठलो. WET TISSUE नेच FRESH झालो😛. सामान आवरलं. दात घासले. खूप वर्षांनी Colgate Powder वापरली दात घासायला. चहा-नाश्त्यासाठी आवाज आला. चहा, अंडा बुर्जी, JAM आणि BREAD वर ताव मारला. BAGS already बाहेर काढलेल्या त्या अडकवल्या, मोठी bag porter कडे देऊन ९.०० वाजता आमची वारी निघाली पुढच्या मुक्कामाकडे. काय खुश होते सगळेच पुढच्या प्रवासासाठी. तब्येत बिघडल्यामुळे आमच्यातले मुंबईचे मोटरमन काका माघारी गेले. आणि आम्ही इकडे 🚶🏾चालायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच एक ठिकाणी डावीकडून उजवीकडे cross करत असताना मधोमध मला आणि Dr. (जयेश) ला crack चा आवाज आला. काय होता तो आवाज 😥😝. घाSSSSSSSणं. ज्याने ऐकला त्यालाच कळणार😝. Dr. ने तर उडीच मारली दुसऱ्या बाजूला😛, कोण चालत बसणार अशात म्हणून. 


इथेच Cross करताना मधोमध Crack चा आवाज आलेला

नुसती घसारा-घसरी 😝
उपाय- Penguin Walk 


VDO 

              थोडं पुढे गेल्यावर घसरायला सुरुवात झाली. अजून आम्ही expert झालो नव्हतो बर्फावर चालण्यात त्यामुळे घसरत होतो. मग निसार ने सांगितलं Penguin सारखं चाला🐧. ते लोक तर जमिनीवर चालल्यासारखे चालतात चादरवर, तेदेखील सामान घेऊन😅. अजून पुढे एका ठिकाणी थोडं पाणी होतं त्यातून चालावं लागलं. जवळपास अडीच तास चालाल्यावर एका अश्या जागी आलो जिथे चादरवर चालू शकणार नव्हतो. risky होतं. त्यामुळे थोडं वर चढून जावं लागलं आणि साधारण १० मिनिटं वर चालून पुन्हा खाली उतरलो. असं चढणं उतरणं असलं कि आपला सह्याद्रीच आठवायचा😅. बराच वेळ झाला, जवळपास अर्ध अंतर कापून झालेलं आणि प्रा. ला मधेच आठवलं कि अरेच्या!!!(Actually आईच्या गावात!! असं असतं ते😝) आपण तर DSLR तिकडेच विसरून आलो😝😝. मग काय निघाली ना पोरगी परत जायला. मग Guide ला सांग असा सल्ला कुठूनतरी गर्दीमधून आला आणि आम्ही निसारला सांगितलं. तो म्हंटला tension मत लो मॅडम पोर्टर लेके आयेगा.


PC: Prajakta



Lunch Break
               १२.३० च्या दरम्यान आम्ही Lunch Break घेतला. जेव्हा lunch break साठी थांबलेलो तेव्हा तो DSLR मॅडमकडे सुपूर्द करण्यात आला😅. हुश्श्श!!!! मिळालाच आहे परत तर photo पण काढून घेतले. जेवण बनतय तोपर्यंत पुन्हा photography. पण आता वर उंच डोंगरांच्या माथ्यावर बर्फ पडतोय हे दिसत होतं🌨. आणि काही वेळाने तेच इथेसुद्धा होणार याची कल्पना आली. त्यामुळे आता DSLR गप्पं बॅगमध्ये गेला आणि ती बॅग सरळ मोठ्या बॅग मध्ये😝. आयुष्यात पहिल्यांदा 😍❄️SNOWFALL चा आनंद घेतला जाणार होता आणि तोपण कुठे? तर Trek करताना😍. याशिवाय अजून मजा ती काय? 😊😎दिल खुश. जेवणात pasta होता. जेवण आटोपलं. सगळ्यांचे poncho, raincoat बाहेर निघाले. आम्हीपण आमचे Poncho परिधान केले आणि snowfall चा आनंद घेत पुन्हा मार्गस्थ झालो. आता मात्र चालताना दम लागत होता. 😅


उजवीकडून डावीकडे सरकत चाललेला Snowfall 
SNOWFALL ची सुरुवात. मागून हळूहळू येतोय.

               
 Snowfall सुरु झाला तसा आSS वासून त्याला पावसाच्या पाण्यासारखा थोडा जिभेवरपण झेलला😛. Snowfall मध्ये चादरवर गाणी ऐकत चाललो होतो. गाणी गाताना मात्र हालत खराब होत होती, कारण गाण्यामुळे जास्त दम लागत होता. १.४५ च्या जवळपास आम्ही एका गोठलेल्या धबधब्याजवळ पोहोचलो. पहिला गोठलेला मोठा धबधबा बघितला आम्ही तो. चालत चालत २.३० वाजेपर्यंत एका ठिकाणी पोहोचलो जो खरंतर आमचा camping point नव्हता पण लीडर ने तिथेच थांबायचा निर्णय घेतला. पण हे सगळ्यांना पटलं नव्हतं😑 कारण उरलेला पूर्ण दिवस आम्ही काय करणार हा प्रश्न होता😅. आणि त्यात आधीचे अडकलेले members, ज्यांच्या Flights ८ ला होत्या त्यांना जास्तीत जास्त cover करून जायचं होतं. मग त्यात असा वेळ घालवून चालणार नव्हतं. निसार शेवटी म्हंटला next campsite ३.३० तासावर आहे जी कि खरंतर २.३० तासावर आहे (हे आम्हाला दुसऱ्या दिवशी तिथे पोचल्यावर कळलं). त्याचं म्हणणं होतं कि सगळेच तेवढं चालू शकतील असं नाही. असं बोलून त्याने decision ग्रुपवर सोडला. आणि मग ग्रुपमध्ये अर्धे तयार आणि अर्धे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आम्ही सगळे म्हणजे जे पुढे जायला तयार होते ते सगळे शेवटी गप्पं बसलो. 



             Tents लागल्या, bags ठेवल्या, खाऊ खाल्ला थोडा आणि मग ४.३० ला चहा नाश्ता झाला, भजी होते! भजी! फळभाजीचे😝. नंतर प्रा. ने आणि मी sledge वर ride मारली. खूप वर्षांनी लहान मुलांसारखं खेळलो होतो. लहानपणी नारळाच्या झावळ्यांमध्ये बसून एकमेकांना खेचायचो😊. तसं आता sledge वर बसून बर्फ़ावर खेचत होतो. खूप मनापासून जगल्यासारखं वाटतं ते क्षण कारण लहान मुलांसारखं तेवढ्याच निखळपणे जोरजोरात हसत, खिदळत होतो, धावत होतो, कशाचीही पर्वा न करता. फक्त तो तेव्हाचा, आहे तो क्षण जगत होतो😁. 



Penalty Shootout VDO

            ते झालं मग पावलं वळली ती Penalty Shootout कडे⚽️. Socs चा छोटा ball बनवलेला होता, Teams बनवण्यात आल्या आणि खेळायला सुरुवात झाली. आमच्या बरोबर porters पण खेळायला आले नंतर. 👳👳 अमर आणि अमन हे दोन जुळे captain झाले आणि भाई भाई आमने सामने उभे राहिले. खून का रिश्ता Rivalry मध्ये convert झाला. प्रा. referee म्हणून उभी होती. अर्थात तिथेपण गल्ली क्रिकेट सारखी रडारडी आणि चिडाचिडी झाली😝. आणि काही झालं कि आम्ही referee वर धावून जायचो आणि दोन्ही team तिच्याजवळ गेल्या कि ती वेडी व्हायची. फुल्ल्ल्ल मजा😝. अंधार पडला आणि आम्ही खेळणं थांबवलं.




Dance  VDO

                मग अमर आणि अमन ने आम्हाला सगळ्यांना salsa dance शिकवला💃. salsa dance करून झाला. मग एका पंजाबी गाण्यावर सगळ्यांचं नाचून झालं. मधेच थोडंसं झिंगाटवर पण नाचलो💃. आता Snowfall पुन्हा चालू झालेला आणि त्यातच उभे राहून, Head-torch लावून आम्ही Dumsharaj खेळायला सुरवात केली. थोडा वेळ खेळलो पण नंतर खूपच थंडी वाजायला लागली😖. मग सगळे गप गुमान Camp Fire जवळ गेले. तिथे पुन्हा socs आगीवर सुकवले. जेवणाची वेळ झाली. मेनू बघून तर फुल्ल Flat😋. Fried Rice, Soup आणि Custard. ताव मारला आणि थोडा tp करून झोपायला गेलो. tent मधलं आवरलं आणि sleeping बॅगमध्ये घुसलो. खूप भारी होता आजचा दिवस त्यामुळे मस्तं झोप लागणार होती पण बाहेर snowfall होत होता त्यामुळे तापमान सुद्धा चांगलंच खाली येणार होतं😅. सौम्य आवाजात मोबाईलवर जुनी गाणी लावली आणि चेहऱ्यावर मस्तं असं Smile घेऊन ९.३० वाजताच गुडूप झालो😇😴.



-क्रमशः-



















Tuesday, March 21, 2017

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-3

 Chadar Trek 
एक स्वप्नं... 
भाग-३



पहिला दिवस:

३ फेब्रुवारी २०१७: Leh ते Chilling बस ने, ३ तास आणि Chilling ते Tilat-Do ३ कि.मी चालत, २ तास.  

              तर ११.१५ ला आमची बस निघाली. ३ तासाचा प्रवास होता. बसमधून जाताना सिन्धु (INDUS) नदी आणि झंस्कार नदीचा संगम दिसला. ३ idiots वाला bridge cross केला. प्रा. ची मस्तं एक झोप काढून झाली😴. रस्त्यावरून दगड-माती हटवायचं काम चालू असल्यामुळे मधेच  २-३ वेळा बस थांबली. त्यातच आम्हीपण खाली उतरुन लगेच photo काढून घेतले😜. पहिल्यांदा बर्फात गेल्यावर आपल्याकडचा प्रत्येकजण जे करेल तेच मीपण केलं. बर्फ हातात घेऊन photo, त्यात उभं राहून photo, गोळा बनवून photo, स्वतःचं नाव लिहून photo वगैरे, वगैरे😝. Landslide मुळे आमचा trek actual starting point च्या अलीकडेच सुरु होणार होता. आणि तेदेखील चादरवर नाही रस्त्यावर चालायचं होतं😅. २.१५ च्या आसपास त्या point ला पोहोचलो. Day pack पाठीला लावल्या आणि आम्ही श्रीगणेशा केला. बर्फ असलेल्या रस्त्यावरून गाड्या जाऊन जाऊन तो slippery झाला होता. त्यामुळे काहीजण डोळ्यांदेखत धपाधप आपटले😝. मधेच प्रा. ने sledge वर ride मारली. आणि त्याच्या Vdo च्या नादात मी जोरात आपटले😂. नंतर मात्र सांभाळून पाय टाकायला सुरुवात केली😁.


उतरताना
PC: Prajakta
                २ तास त्या रस्त्यावर चालल्यानंतर अखेर खाली उतरायचा point आला. आता चादरवर पाय ठेवायचा क्षण जवळ आला होता😁. निसार हा आमचा trek leader होता. तो एकेकाला हात देऊन हळूहळू उतरवत होता. पडत, घसरत, स्वतःला सावरत एकदाचं खाली उतरलो आणि चादरवर पाय ठेवला😅. तेव्हाचा आनंद अवर्णनीय आहे, कारण जो काही गोंधळ झालेला त्यामुळे finally चादरवर पाय ठेवल्यानंतर ढगातंच होतो👻👻. ४.१५ वाजता आम्ही खाली उतरलो. 😅 सगळे वेडेच झालेले, सगळीकडे खचाखच photo click होत होते. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भलीमोठी SMILE होती. आनंद पोटात नाही, तर चेहऱ्यावर मावत नव्हता. 😍😍 प्रत्येकजण निसर्गाचं ते अनोखं, लोभसवाणं रुप नजरेत साठवून आणि कॅमेऱ्यात टिपुन घेत होता. मधेच संथ आणि मधेच उथळ होऊन वाहणारी झंस्कार तिचं जगावेगळं संगीत ऐकवत होती. काहीसा वेळ या साऱ्यातच आम्ही गुंग होतो. मग थोड्या वेळाने समोरच असलेल्या आमच्या camp कडे अखेर पावलं वळली.


  

PC: Prajakta




Tilat-Do ला तिकडे आम्ही पोहोचायच्या आधीच team ने tents लावल्या होत्या आणि ते त्यांच्या 
जेवणाच्या तयारीला लागले होते. DSLR बाहेर निघाले आणि photoshoot सुरु झालं. ५.१५ ला "चाय लेलो चाय" असा आवाज आला😃. चादर वर पहिला चहा. 😁अहाहा!! लगेच १५ मि. नि सगळ्यांची आवडती maggie आली (खायची वाली😜). हळूहळू अंधार पडला आणि सगळे campfire जवळ जमा झाले. आम्हाला आगीजवळ जास्त जायचं नव्हतं कारण तिथल्या तापमानाशी जुळवून घ्यायचं होतं😅. त्यामुळे आम्ही थोडं लांबच होतो. सगळे नुसतेच उभे होते, म्हणून म्हंटलं जरा Intro. करून द्या प्रत्येकाने स्वतःचा. आणि मग एकेक करून सगळ्यांनी नावं सांगितली. लक्षात तर कोणाचंच नाही राहिलं पहिल्या दिवशी तो वेगळा भाग 😜. असो. 






               "खाना लेलो खाना" असा आवाज आला आणि आमचा चादरवर पहिला dinner झाला. दाल-राईस आणि लोणचं. आणि पुढे एक सुखद धक्का बसला जेव्हा कानांवर "Sweet Dish लेलो "हे "गोड" शब्द पडले😍😜. शेवया होत्या शेवया😋😋. आपल्याला कुठे सवय असते सह्याद्रीत trek ला गरम गरम Sweet Dish वगैरे प्रकाराची 😝. उणे तापमानात, कुडकुडत, आगीजवळ जेवायचा अनुभवच निराळा 😅😄. जेवलो, थोडा वेळ socs आगीवर सुकवले आणि आता पावलं वळली tent कडे. 3-Men tent मध्ये दोघीच असल्यामुळे सामान ठेऊन आम्हालापण मस्त जागा उरलेली. खुश होतो😁. पण हासुद्धा आनंद फार काळ टिकला नाही😝. काळ कसला काही मिनिटंसुद्धा टिकला नाही. एकाने येऊन सांगितलं तुम्हाला त्या पहिल्या 2-Men tent मध्ये shift व्हावं लागेल. मग काय उचलला आमचा बोरिया बिस्तारा आणि पडलो बाहेर😝. आमच्या नवीन घरात जागेची कमी जाणवू लागली 😜😓. ११ वाजले, तसंच adjustment करून झोपलो. -४० च्या sleeping bag मध्ये एकदा घुसलो कि थोड्या वेळाने बाहेरची थंडी जाणवत नाही😀. प्रा. ला म्हंटलं आपण finally चादरवर आहोत 💃💃. आता उद्या खरा trek सुरु होणार होता. उद्या काय काय बघायला मिळेल या विचारात डोळे मिटले आणि झोपी गेलो. 😴😴






--क्रमशः--




















Monday, March 13, 2017

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-२

Chadar Trek
एक स्वप्नं...

भाग-२




१ फेब्रुवारी २०१७:
               तर airport वरून taxi ने आम्ही polo ground वर उतरलो. समोरंच आमचं हॉटेल होतं तिथे गेलो. पण तिथे त्या वेळेला रूम available नसल्यामुळे खालच्या हॉटेल मध्ये जावं लागलं. तिथे Coffee आणि Egg bread Toast खाल्लं. त्याच्या शुल्कावरून (Price💰) 🤑🤔असं वाटलं कि बहुतेक त्याने सोन्याचं अंडं वापरलं असावं बनवायला😛. तसा विमानात नाश्ता झाला होता पण तो पुरेसा नव्हता. तिथेच बसलेलो असताना काही जणांशी ओळख झाली. आणि काय सांगावं, ते सगळे मराठीच होते😃. परप्रांतात आपली मायबोली कानावर पडली कि, काय आनंद 😄होतो म्हणून सांगु. सुजय आणि प्रा. तर लांबचे बहीण-भाऊ निघाले 😄आणि राजेश शेजारी. गप्पा टप्पा झाल्या. मग आमचा Coordinator मनू ने आम्हाला सद्यस्थिती काय आहे हे सांगितलं आणि म्हंटला कि आज संध्याकाळी ७.३० ला सांगितलं जाईल, ट्रेक चालू झाला आहे कि नाही ते. त्यानंतर १२.३० च्या आसपास आम्हाला रूम देण्यात आली. रूम बघून तर खूषच होतो आम्ही💃💃(हा आनंद फक्त एक दिवस टिकला😝, पुढे कळेलंच). दोन मोठ्या खिडक्या ज्यामधून खतरनाक View😍😍(Leh Palace, Polo Ground, Shanti Stupa, Snow Capped Mountains सगळंच😛) दिसत होता. रूम मध्ये एक मोठा bed आणि २४ इंची Plasma TV.



बर्फाचं पाणी 
              Fresh होण्यासाठी रूममधे पाणी मागवलं. बादलीभर पाणी आलं खरं पण पाण्यात बर्फ होता😬. मग काय, तसंच बर्फाचं पाणी वापरलं😖. बाहेर येऊन Gloves घाले पर्यंत हात नसल्यातच जमा होते😛. थोड्या वेळाने, जवळपास २ वाजता जेवायला बाहेर पडलो. मार्केटमध्ये मला fleece jacket विकत घ्यायचं होतं ते घेतलं आणि जेवून पुन्हा रूमवर आलो. प्रा. ने Down Jacket घातलं नव्हतं (दिल्लीला झालेल्या गोंधळात ते मैत्रीणीकडेच राहून गेलेलं) त्यामुळे ती अक्षरशः कुडकुडत होती😣. दुपारचे ३-३.३० झाले असतील. मी नवीन घेतलेलं Fleece jacket घातलं आणि प्रा. ला Feather Jacket दिलं. आणि आधी जाऊन Bed वर Blanket खाली घुसलो😅. ३ Layer होत्या एकूण पांघरुणाच्या. Mobile वर मस्तं जुनी गाणी लावली 📱🎶आणि आम्ही मस्तं गाढ झोपलो😴. तेव्हा जे झोपलो ते direct ७ वाजताच उठलो😅
रुममधून दिसणारा Leh Palace
आमची पहिली रूम 


               उठून पुन्हा खालच्या हॉटेल मध्ये गेलो कारण तिथे मनू trek चालू झाला कि नाही हे सांगणार होता😅. सर्वजण जमले होते. मनू ने सांगायला सुरुवात केली. दोन गोष्टी आहेत म्हंटला. पहिली गोष्ट म्हणजे Trek चालू झाला आहे👻 आणि दुसरी म्हणजे उद्या जवळपास ४०० लोक जे ट्रेक बंद झाल्यामुळे रखडले होते ते उद्या सुरु करणार आहेत त्यामुळे आपण Trek उद्या सुरु न करता परवा सुरु करणार आहोत😅. आमच्यासाठी तर दोन्ही गोष्टी चांगल्याच होत्या 👻👻 कारण acclimatize होण्यासाठी अजून एक दिवस मिळाला होता. पण जे आधीच्या batch चे members होते त्यांच्या return flights लवकर असल्यामुळे त्यांचा trek complete होणार नव्हता😬. मग तिथेच आमचे medical form, entry fee आणि photo घेऊन Pulse Oximeter ने Blood oxygen level check केली. माझी पहिल्यांदा Blood oxygen level check केली तेव्हा reading कमी दाखवलं. 😰 मग परत एकदा check केलं तेव्हा बरोबर दाखवलं😅. एका मिनिटासाठी काय झालं आत, हे माझं मला माहित😜. नंतर चेहऱ्यावर हसू मावत नव्हतं. आमच्या वेडेपणाचं पाहिलं यश होतं ते😇. तिथेच खाली जेवलो. जेवल्यावर पुन्हा तोच प्रश्न (Price मुळे) कि या बाबाने खरंच आम्हाला काहीतरी सोन्या-चांदीचं खायला दिलं असेल जे आम्हालाच कळत नाहीये😛. जेवण करून रूममध्ये गेलो. TV वर मस्त जुनी गाणी लावली आणि बघत बसलो. त्यातच ११ वाजले आणि मग गप्पं झोपलो😴😴.  




२ फेब्रुवारी २०१७: 
               सकाळचे ७.३० झाले आणि आमचा दुसरा दिवस उजाडला. प्रा. उठून खिडकी जवळ गेली, पडदे बाजूला केले आणि खिडकीवर जे दिसलं ते बघून मला तिने आवाज दिला 🗣. पटकन इकडे ये, हे बघ काय झालंय😍. खिडकीवर आतून बर्फ जमा झाला होता पण वेगळ्याच प्रकारे😵, Window Frost म्हणतात त्याला. 😍आपल्यासाठी तर नवीनच. Frozen movie आठवला ते बघून, डोकयात Let It Go वाजायला सुरुवात झाली😜😝. मग पुन्हा बर्फाच्या थंडगार पाण्याने प्रातःविधी आवरले(अंघोळीचा प्रश्नच उद्भवत नाही इथे😜😝). आमची रूम दुपारी change होणार होती त्यामुळे नाश्ता केला आणि सामान आवरून shift केलं. 





Window Frost



Leh Market

              प्रा. ला अजून Down Jacket विकत घ्यायचं होतं, दोघींना Fleece pants, Gum Boots घ्यायचे होते. तिचा एक लदाखी मित्र (Gyatso) आम्हाला मार्केट फिरवणार होता (भाव करायला सोप्पं जाणार होतं😜). १.३० च्या आसपास बाहेर पडलो. थंडीमुळे आधी Jacket घेतलं आणि मग जेवायला गेलो. New Wazwan Planet मध्ये Chicken, Mutton हाणलं😋. ४ वाजता पुन्हा रूमवर. पुन्हा तेच, जुनी गाणी आणि झोप. जेवायच्या वेळेत उठलो पण दुपारी जेवून लगेच झोपल्यामुळे दुपारचंच अजून जिरलं नव्हतं. प्रा. ला लागलं मळमळायला 🤢 त्यामुळे ती काही जेवली नाही. तिचं चाललेलं कि उद्या Trek ला जायचंय आणि आता हे काय होतंय. शेवटी तिने दुपारचं Chicken, Mutton एकदाचं बाहेर काढलं 🤢 तेव्हा कुठे तिला बरं वाटलं😄. Trek coordinator सोमिल ने सकाळी ९.३० ला खाली तयार रहा सांगितलं. आम्ही porter करणार होतो त्यामुळे नको असलेलं सामान माझ्या Bag मधे ठेवून ती हॉटेलमध्येच ठेवणार होतो आणि लागणारं सगळं सामान प्रा. च्या मोठ्या bag मध्ये घेऊन ती porter ला देणारं होतो. त्यामुळे बॅगची सगळी आवराआवर करायला घेतली. रात्री ३ वाजेपर्यंतं तेच करत होतो 😝. सगळं आवरलं आणि मग उद्या आपण trek ला जाणार😍 या आनंदात झोपलो.  

Lunch  at New Wazwan Planet
३ फेब्रुवारी २०१७:

एक झलक 😜
अखेर तो दिवस उजाडला. प्रातःविधी उरकले. नावाला चिमणी कावळ्यांसारखी पाणी शिंपडून अंघोळ केली 😝 आणि आमची तयारी सुरु झाली. TV वर गाणी चालू होती त्यामुळे नाचत नाचतंच सगळं चाललेलं आणि नाचायचं shooting पण चाललेलं 😝. Dance Pro. अश्या प्रा. ताईंचा "चीटीया कलाइया" वर special dance झाला. (सूचना: Public demand नुसार VDO Post करायचा कि नाही हे ठरवण्यात येईल, त्यामुळे आपली मागणी लवकरात लवकर कळवा.😜). एव्हाना ९.३० कधीच वाजून गेले होते. आम्ही आमचं बुलावा येत नाही तोपर्यंत होईल तसं नाचत नाचत उरकत होतो. १०.३० झाले आणि अखेर सगळं आवरलं आणि आम्ही bags घेऊन निघालो. Hotel मध्ये एक bag ठेवली आणि बसकडे निघालो. मोठी bag porter कडे दिली. अजून बरीचशी मंडळी यायची बाकी होती तोपर्यंत आम्ही थोडं photoshoot केलं. सामान load झालं आणि मग ११.१५ ला बस निघाल्या. आम्ही दोघी आणि इतर मुंबईकर मंडळी एकाच बसमधे होतो त्यामुळे "गणपती बाप्पा मोरया" चा गजर झाला आणि आम्ही आमच्या स्वप्नपूर्तीकडे प्रवास सुरु केला.        

मार्गस्थ 





भाग-२
--समाप्त--