Tuesday, March 21, 2017

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-3

 Chadar Trek 
एक स्वप्नं... 
भाग-३



पहिला दिवस:

३ फेब्रुवारी २०१७: Leh ते Chilling बस ने, ३ तास आणि Chilling ते Tilat-Do ३ कि.मी चालत, २ तास.  

              तर ११.१५ ला आमची बस निघाली. ३ तासाचा प्रवास होता. बसमधून जाताना सिन्धु (INDUS) नदी आणि झंस्कार नदीचा संगम दिसला. ३ idiots वाला bridge cross केला. प्रा. ची मस्तं एक झोप काढून झाली😴. रस्त्यावरून दगड-माती हटवायचं काम चालू असल्यामुळे मधेच  २-३ वेळा बस थांबली. त्यातच आम्हीपण खाली उतरुन लगेच photo काढून घेतले😜. पहिल्यांदा बर्फात गेल्यावर आपल्याकडचा प्रत्येकजण जे करेल तेच मीपण केलं. बर्फ हातात घेऊन photo, त्यात उभं राहून photo, गोळा बनवून photo, स्वतःचं नाव लिहून photo वगैरे, वगैरे😝. Landslide मुळे आमचा trek actual starting point च्या अलीकडेच सुरु होणार होता. आणि तेदेखील चादरवर नाही रस्त्यावर चालायचं होतं😅. २.१५ च्या आसपास त्या point ला पोहोचलो. Day pack पाठीला लावल्या आणि आम्ही श्रीगणेशा केला. बर्फ असलेल्या रस्त्यावरून गाड्या जाऊन जाऊन तो slippery झाला होता. त्यामुळे काहीजण डोळ्यांदेखत धपाधप आपटले😝. मधेच प्रा. ने sledge वर ride मारली. आणि त्याच्या Vdo च्या नादात मी जोरात आपटले😂. नंतर मात्र सांभाळून पाय टाकायला सुरुवात केली😁.


उतरताना
PC: Prajakta
                २ तास त्या रस्त्यावर चालल्यानंतर अखेर खाली उतरायचा point आला. आता चादरवर पाय ठेवायचा क्षण जवळ आला होता😁. निसार हा आमचा trek leader होता. तो एकेकाला हात देऊन हळूहळू उतरवत होता. पडत, घसरत, स्वतःला सावरत एकदाचं खाली उतरलो आणि चादरवर पाय ठेवला😅. तेव्हाचा आनंद अवर्णनीय आहे, कारण जो काही गोंधळ झालेला त्यामुळे finally चादरवर पाय ठेवल्यानंतर ढगातंच होतो👻👻. ४.१५ वाजता आम्ही खाली उतरलो. 😅 सगळे वेडेच झालेले, सगळीकडे खचाखच photo click होत होते. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भलीमोठी SMILE होती. आनंद पोटात नाही, तर चेहऱ्यावर मावत नव्हता. 😍😍 प्रत्येकजण निसर्गाचं ते अनोखं, लोभसवाणं रुप नजरेत साठवून आणि कॅमेऱ्यात टिपुन घेत होता. मधेच संथ आणि मधेच उथळ होऊन वाहणारी झंस्कार तिचं जगावेगळं संगीत ऐकवत होती. काहीसा वेळ या साऱ्यातच आम्ही गुंग होतो. मग थोड्या वेळाने समोरच असलेल्या आमच्या camp कडे अखेर पावलं वळली.


  

PC: Prajakta




Tilat-Do ला तिकडे आम्ही पोहोचायच्या आधीच team ने tents लावल्या होत्या आणि ते त्यांच्या 
जेवणाच्या तयारीला लागले होते. DSLR बाहेर निघाले आणि photoshoot सुरु झालं. ५.१५ ला "चाय लेलो चाय" असा आवाज आला😃. चादर वर पहिला चहा. 😁अहाहा!! लगेच १५ मि. नि सगळ्यांची आवडती maggie आली (खायची वाली😜). हळूहळू अंधार पडला आणि सगळे campfire जवळ जमा झाले. आम्हाला आगीजवळ जास्त जायचं नव्हतं कारण तिथल्या तापमानाशी जुळवून घ्यायचं होतं😅. त्यामुळे आम्ही थोडं लांबच होतो. सगळे नुसतेच उभे होते, म्हणून म्हंटलं जरा Intro. करून द्या प्रत्येकाने स्वतःचा. आणि मग एकेक करून सगळ्यांनी नावं सांगितली. लक्षात तर कोणाचंच नाही राहिलं पहिल्या दिवशी तो वेगळा भाग 😜. असो. 






               "खाना लेलो खाना" असा आवाज आला आणि आमचा चादरवर पहिला dinner झाला. दाल-राईस आणि लोणचं. आणि पुढे एक सुखद धक्का बसला जेव्हा कानांवर "Sweet Dish लेलो "हे "गोड" शब्द पडले😍😜. शेवया होत्या शेवया😋😋. आपल्याला कुठे सवय असते सह्याद्रीत trek ला गरम गरम Sweet Dish वगैरे प्रकाराची 😝. उणे तापमानात, कुडकुडत, आगीजवळ जेवायचा अनुभवच निराळा 😅😄. जेवलो, थोडा वेळ socs आगीवर सुकवले आणि आता पावलं वळली tent कडे. 3-Men tent मध्ये दोघीच असल्यामुळे सामान ठेऊन आम्हालापण मस्त जागा उरलेली. खुश होतो😁. पण हासुद्धा आनंद फार काळ टिकला नाही😝. काळ कसला काही मिनिटंसुद्धा टिकला नाही. एकाने येऊन सांगितलं तुम्हाला त्या पहिल्या 2-Men tent मध्ये shift व्हावं लागेल. मग काय उचलला आमचा बोरिया बिस्तारा आणि पडलो बाहेर😝. आमच्या नवीन घरात जागेची कमी जाणवू लागली 😜😓. ११ वाजले, तसंच adjustment करून झोपलो. -४० च्या sleeping bag मध्ये एकदा घुसलो कि थोड्या वेळाने बाहेरची थंडी जाणवत नाही😀. प्रा. ला म्हंटलं आपण finally चादरवर आहोत 💃💃. आता उद्या खरा trek सुरु होणार होता. उद्या काय काय बघायला मिळेल या विचारात डोळे मिटले आणि झोपी गेलो. 😴😴






--क्रमशः--




















4 comments:

  1. अप्रतिम फोटो अन अनुभव ही !

    ReplyDelete
  2. मस्त लिहिले आहे नेहमी प्रमाणे अणि फ़ोटो ooossuumm :)

    ReplyDelete