Friday, May 26, 2017

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-६

Chadar Trek 
एक स्वप्नं... 

भाग-६








चौथा दिवस:
६ फेब्रुवारी २०१७:  Sumdo-Tibb-Nerak-Tibb, ४१ कि.मी, १२ तास.

              ७ वाजता उठलो. 😀दात घासले. प्रातःविधी उरकले😅. bags pack केल्या आणि ready झालो. चहा नाश्त्यासाठी आवाज आला. Bread बुर्जी चा नाश्ता झाला. एकूण २६ जण होतो सुरुवातीला. त्यातले २ जण आधीच परत गेलेले आणि आज ८ला return flight असल्यामुळे १३ जण परत जाणार होते. सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला, Dr. ने जाता जाता त्याच्याकडचे chocolates दिले😋. एक Group Photo झाला आणि आम्ही ९.१५ वाजता आपापल्या वाटेला निघालो. 





               आज चादर थोडी बऱ्यापैकी form झालेली होती. Fresh तयार झालेल्या पातळ चादर वर चालताना जो आवाज येत होता, तो ऐकुन पहिल्यांदा कोणाचीही तीन ठिकाणी होऊ शकते😰. कर्र्कर आवाज करत तो Patch पार केला😅. पुढे संपूर्ण नदीचं पात्र गोठलेलं होतं😍 आणि त्यावर snow ची layer. आज खरं सौंदर्य अनुभवत होतो आम्ही. 3 दिवस जे बघितलेल ते काहीच नव्हतं, असं वाटत होतं. आजवर फक्त चित्रात आणि Wallpaper मधे बघितलेलं जग,😍 याची देही याची डोळा अनुभवत होतो. हात gloves मधून बाहेर काढले तर नसल्यात जमा व्हायचे पण तरीसुद्धा ते देखणं रूप टीपायचा मोह आवरत नव्हता😛. प्रा. चा २वेळा गणपती बाप्पा झाला, नेमकं टिपता नाही आलं😜. बऱ्याच वेळाने, मधे एका frozen waterfall जवळ सगळ्यांनी break घेतला. खजूर, काजू, बदाम, chocolates, अक्रोड मिळेल ते कोंबलं आणि पुन्हा सुरु. आज आरामात चाललो होतो😛.  १२.१५ वाजलेले. Tibb चा camp दिसायला लागला. पण माझी photography काही संपत नव्हती. शेवटी प्रा. म्हंटली, अगं चल आधी, bag ठेऊन DSLR घेऊन ये आणि बस मग photo काढत😅. पण पुढे वेगळाच plan ऐकायला मिळाला😅
Frozen 

Tibb Campsite 
दोघी मिळून SOLO Trek  ;P 
गेलो camp जवळ, bags टाकल्या आणि टेकुन बसलेले. इतक्यात राकेश ने लोबोशी बोलून नेरक बद्दल घेतलेला निर्णय सांगितला. नेरकला न जाता tibb वरून मागे फिरण्यात काही मजा नव्हती पण guide तर पुढे न्यायला तयार नव्हता😑. मग आपापल्या risk वर ज्यांना जायचंय त्यांनी चला, बाकीचे थांबा असं सांगण्यात आलं. आम्हाला येऊन ५ मिनिटेच  झालेली😅. लोबो, आमचा guide आमच्या बरोबर येणार होता. पण फक्त रस्ता दाखवायला😅. जायला ४ तास आणि यायला ४ तास एवढा मोठा पायी प्रवास होता😑. १२.३० वाजून गेलेले, यायला आधीच रात्रं होणार होती. म्हणून मग सगळ्यांनी lunch न करता निघायचं ठरवलं🙊. आम्ही आपल्या पिट्टू काढल्या, होतं तेवढं १.५ ली. पाणी घेतलं (दोघीत😐), बदाम, chocolates घेतले, प्रा. ने DSLR घेतला न चुकता😜आणि निघालो. प्रत्येकजण आपापल्या speed ने चालत होता. माझ्या उजव्या पायाला सकाळपासून Shoe लागत होता, एक socs काढला तरी काही फरक नाही. आणि त्यात हरिश्चंद्राच्या उजव्या नळीच्या वाटेची आठवण होतीच 🙊(सुजलेला पाय), त्यामुळे speed कमी झाला होता. थोड्या वेळाने पुढचे आणि मागचे सगळेच आमच्या नरजेच्या टप्प्याबाहेर गेलेले आणि आम्ही स्वप्नं जगत असल्यासारखं वाटलं😇. कारण मधे आम्ही दोघीच चाललो होतो. 😍अहाहा!! आतापण आठवल्यावर भलीमोठी smile येते तोंडावर😁. चारही बाजूला बर्फाने नटलेले डोंगर, छोटे छोटे गोठलेले धबधबे, मधेच शांत, मधेच खळखळणारी झंस्कार, निरभ्र निळंशार आकाश, त्यात एका दिशेला सूर्य 🌞आणि एका दिशेला भरदिवसा दिसणारा चंद्र🌜. आणि या सगळ्याला चार चांद म्हणजे आमची येड्या-बहिऱ्याची जोडी.🙅🙆👻😝


हीच ती वीतभर चादर 
चालत चालत एका Patch जवळ आलो. जिथे फक्त एक पाय ठेवण्यापुरता चादर होती😥. आधीच snow मुळे तेपण घसरटं झालेलं. घसरलो तर direct subzero temp. च्या पाण्यात🙊. प्रा. पुढे होती ती तिथेच थांबली आणि मला म्हंटली आपण risk तर नाही घेत आहोत ना उगाच😛. मी काही बोलायच्या आधी तिला माझ्या नजरेतूनच कळलं. 💪🏽पठ्ठी निघाली ना पुढे. मी म्हंटलं, बास्स का यार!! इथून मागे फिरायला थोडीना एवढं सगळं करून आलोय😁. काय नाय होत. मी म्हंटलं पुढे जाऊ का मी? तर नको म्हंटली. stick चा आधार घेत घेत झालं पार😅. समोर नेरकचा तो धबधबा दिसत असताना मागे फिरणं केवळ अशक्य होतं. निसर्ग बरोबर सांभाळून घेतो आपल्यासारख्यांना. मधेच आश्चर्य म्हणजे एवढं सगळं गोठलेलं असताना खळखळ वाहणारा एक ओढा लागला, त्यातूनच जायचं होतं आम्हाला. असं सगळं पार करत एकदाचं त्या भल्या मोठया गोठलेल्या धबधब्याजवळ पोहोचलो😍. 





नेरकचा लाकडी पूल दिसला. आम्हाला तिथे बघून आधी पोहचलेल्यांना आश्चर्य वाटत होतं😱. त्यांना वाटलेलं आम्ही काय तो patch cross करून आलो नसतो, मागे फिरलो असतो पण त्यांना काय माहित, असलं काही आपण करत नसतो😎. पुन्हा एकदा photoshoot सुरु. 😁एवढा मोठा गोठलेला धबधबा या डोळ्यांनी स्वप्नात सुद्धा पाहिला नव्हता मग आता समोर असताना कसं आवरणार स्वतःला. प्रा. ने (उर्फ Basicवालीने😜) त्याच्या एका कोपऱ्यात चढायची धडपडपण करून बघितली. तिरंगा घेऊन group photo काढला. 


संध्याकाळी ५.४५ वाजता

आम्ही ठरवलेलं जास्तं नाही थांबायचं कारण परत ४ तास चालायचंय आणि जेवढं अंतर daylight मधे cover करता येईल तेवढं करायचं. ४.४५ वाजलेले. प्रत्येकजण आपापल्या speed ने निघाला. मला आता चालायला जास्तं त्रास होत होता😅. आणि एक कमी होता म्हणून कि काय दुसरा पण shoe थोडा थोडा लागायला लागला🙊. परत आम्ही दोघीच चाललेलो. ६ वाजले, अंधार पडला आणि मग सगळ्यांनी एकत्र चालायचं ठरलं. चादरवर night trek करत होतो आम्ही👻👻.






मस्तं चांदणं पडलेलं, दिवसा नाही दिसले तेवढे सुंदर दिसत होते डोंगर. चंद्रप्रकाशात! 😍वर काळंभोर आभाळ आणि खाली पांढराशुभ्र बर्फ.😍 नशीबवान होतो. सगळ्यांना असा अनुभव नाही मिळत. एका point ला तर कडेला चादरच नव्हती🙊, थोडं पाण्यातुन जावं लागलं आणि आम्हाला येताना असं काही केलेलं आठवत नव्हतं😛. सगळ्यांना प्रश्नं पडलेला आपण नक्की बरोबर चाललोय ना? 😂एव्हाना सगळ्यांकडचं पाणी संपलेलं आणि तहान तर लागलेली. मग काय, पिलो गप्पं दातांना कळ मारेल असं झंस्कारचं थंडगार पाणी😆. नंतर चालतोय, चालतोय, नुसतं चालतोच आहोत, संपेनाच. प्रा. ने मला विचारलं, आपल्या सह्याद्रीसारखा चकवा लागू शकतो का हिमालयात? 🤔नाही, असं काही नसेल म्हंटलं. 😪आता सगळेच दमले होते. असं झालेलं कधी एकदाचा camp नजरेस पडतोय. थोडं काही मिणमिणतं दिसलं कि वाटायचं पोहचलो बाबा😃, पण तो दुसराच camp असायचा😝. एकदाचा आमचा camp दिसला आणि काय सुखावले सगळेजण म्हणून सांगू😅. एकदम खुश. आणि का नसणार? १२ तास चालून पराक्रमच करून आलेलो तसा. 💪🏽💃 

आम्ही पोहचल्यावर मस्तं आरडाओरडा झाला,🗣 चित्र-विचित्र आवाज काढून झाले. चोSS चोSS ले झालं. दुसऱ्या Group च्या trekkers ना आश्चर्य आणि कौतुक वाटत होतं. नंतर जे tent मधे घुसलो ते घुसलोच😅. सगळ्यात आधी shoes काढले आणि पायाचं काय झालंय ते बघितलं🙊. उजवा तर मस्तं सुजलेला😂. आज सगळेच दमलेले त्यामुळे सगळ्यांना tent मधे आयता चहा आणून दिला गेला. चहा नंतर जेवण तयार होतंच. तेपण tent मधे आयतं मिळालं. रोटी, भाजी, भात, मुगाची आमटी आणि custard😋. आज काही दमशराज वगैरे शक्य नव्हतं😝 आणि tibb ला थंडीपण खूप होती. खूप म्हणजे खूप. (रात्रीतर -४० तापमान झालेलं) हात पाय घासून गरम केले आणि ओल्या sleeping bag मधे घुसलो. Tent मधूनच ओरडून सगळ्यांनी एकमेकांना Good Night केलं आणि भली मोठी Smile करत सगळे झोपी गेले.😁😴 

-क्रमशः-


प्रवासातले आणखी काही PHOTOS:

Tibb ला जाताना 

Tibb ला जाताना 





Tibb ला जाताना

Tibb ला जाताना 

एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य

गोठणाऱ्या तापमानात खळखळत वाहणारा ओढा

नेरकचा लाकडी पूल 

Add caption

परतीचा प्रवास