Chadar Trek एक स्वप्नं... भाग-७
शेवटची रात्र.
शेवटची रात्र.
७ फेब्रुवारी २०१७: Tibb-Gylpo , २६ कि.मी, ८ तास.
तर १२ तास, ४१ किमी चालायचा पराक्रम करून आलो😁आणि जेवण वगैरे उरकून Sleeping bag मध्ये घुसलो. Tibb ला तापमान सगळ्यात खाली गेलेलं.😖 त्या रात्री -४० डिग्री गाठलेलं. मधेच रात्री प्रा. ला वाटलं बाहेर Snowfall चालू आहे म्हणून तिने उठून बाहेर बघितलं पण तसं काहीच नव्हतं😕. आम्ही आधीच ओल्या Sleeping bag मध्ये झोपलेलो.😖 रात्री खूपच थंडी वाजायला लागलेली. पहाटे उठल्यावर बघितलं तर tent ला आतून आमच्या श्वाशोच्छ्वासामुळे moisture पकडून frosting झालं होतं. 😮प्रा. च्या पापण्यांवर, भुवयांवर बर्फ जमा झालेला. फोटो काढले आणि परत झोपलो😂. ते ८ वाजताच उठलो. काही दात वगैरे घासायची हिम्मत नव्हती, त्यामुळे नाही घासले😝. चूळ भरलेलीच खूप होती😜. Fresh व्हायला म्हणून Wet Tissue च पाकीट बाहेर काढलं तर त्याचा अक्षरशः दगड झालेला😑. पूर्णपणे गोठलेलं ते. एकही tissue बाहेर नाही खेचता आला. मग काय तसंच आवरलं😛.
![]() |
| frosting, ओल्या sleeping bag, बर्फ |
😅आता प्रा. मागे बाकीच्यांबरोबर आरामात येत होती आणि मी एकटीच पुढे आलेले. पुढे Guide थांबलेला तिथे मीपण हिची वाट बघत थांबले. तेवढ्यात कड्कड्कड् आवाज आला जोरात😮. Guide म्हंटला वो देखो मॅडमजी चद्दर टूट रहा है! 😱आणि मी अक्षरशः चादर तुटून पाण्यात वाहून जाताना पाहिली. काय आवाज होता म्हणून सांगु. 😘खतरनाक!! आणि तेपण ३ वेळा पाहिली😍. नेमकं कॅमेऱ्यात टिपता नाही आलं, पण नजरेने टिपलं. तेही नसे थोडके. 😅असो. प्रा. ला आल्यावर सांगितलं. ऐकून येडी झालेली. थोडं थांबुन बघितलं पण परत कुठे काही तुटायचं चिन्हं दिसत नव्हतं😂. पुढे रस्त्यात एका Frozen Waterfall जवळ guide आम्हाला घेऊन गेला 😍. दोघीच होतो. फोटोशूट झालं. प्रा. चा गणपती झाला त्याचेपण फोटो काढले😝. पुन्हा मार्गस्थ. आमच्यावेळी जाताना एवढ्या Cracks नव्हत्या दिसल्या पण आज संपूर्ण चादरवर Cracks दिसत होत्या. 😮मधोमध तर धसलेली दिसत होती. चादरची ती अवस्था बघून कळलं कि आता या पुढच्या Groups चा ट्रेक पूर्ण होणं कठीण आहे😟.
![]() |
| धसलेली चादर |
| PC: प्राजक्ताताई पराडकर इथे रात्रीच्या चांदण्यात फेरफटका मारणं स्वप्नवत आहे. |
-क्रमशः-
प्रवासातले आणखी काही photos
| PC: प्राजक्ताताई पराडकर |
| PC: प्राजक्ताताई पराडकर |
| २डोळे, नाक, तोंड वाला दगडी चेहरा PC: प्राजक्ताताई पराडकर |
| Mountain goat चे पायाचे ठसे PC: प्राजक्ताताई पराडकर |
| Day २ campsite |
![]() |
| छोटंसं हॉटेल |
![]() |
----संपले----😂






























