नुकत्याच आमच्या परममैत्रीण प्राजक्ता ताई पराडकर😜😝 यांनी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना काही फोटो पाठवले😍💖. रोहतांग पास चे. ते फोटो पाहून सुचलेल्या काही ओळी. पर्वतरांगा, डोंगररांगा, हिमालय, सह्याद्री आणि आपला प्रिय कोकणकडा यांना सगळ्यांनाच उद्देशून.
![]() |
| PC: प्राजक्ताताई पराडकर |
अभिलाषा
असामान्य तुझ्या या सौंदर्यावर,
भिरभिरणारीही नजर स्थिरावे.
लुसलुशीत या ढगांपरी,
वाटे, मी ही तुझ्या कुशीत शिरावे.
व्हावे तुझाच एक भाग,
मज, माझे अस्तित्व ना स्मरावे.
विसरुनी जावे माझे "मी" पण,
अन, धुक्यापरी अलगद विरावे.
-स्वछंद.
![]() |
| PC: प्राजक्ताताई पराडकर |


No comments:
Post a Comment