Wednesday, December 21, 2016

Photography - राजगड ते तोरणा

प्रयत्न अजून थांबवलेले नाहीत.😜
Trek - राजगड-तोरणा 
#MotoG4 Plus Camera




पद्मावती तलाव





पद्मावती माचीवरून पाहिलेला सूर्यास्त 

सूर्योदयानंतरचे रंग आणि पाली दरवाज्याच्या पायऱ्या. 


सूर्योदयानंतरचे बदललेले रंग 

सूर्योदयानंतरचे बदललेले रंग 

तोरण्यावरून दिसणारा सूर्योदयाच्या आधीचा  राजगड 

राजगडाच्या खांद्यावरून वर आलेला सूर्यदेव.

एकाच वेळी कितीतरी रंग
 झुंजार माचीवरून तोरणा असा दिसतो. 

झुंजार माचीवरचं पाण्याचं टाकं 

प्रचंडगडाची (तोरणाची ) नावाप्रमाणेच झुंजार अशी झुंजार माची. 

लीडरवा गारद देताना.  (मागे जो दिसतोय तो राजगड)


Saturday, December 17, 2016

AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ७

 AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ७





                रात्री गुहेत झोपलो खरं. पण गुहेत जमिनीला वळ आलेला होता आणि बाहेर मरणाची थंडी😖. त्यामुळे रात्रभर पुन्हा एकदा थंडीने झोपेची वाट लावली होती. रात्रभर नुसती वळवळ. बरं, उठून torch लावावी म्हंटलं तर घोरत पडलेत त्यांची झोपमोड व्हायची भीती😒. असंच कुस बदलता बदलता ५ वाजले. मला वाटलं मी एकटीच जागी आहे कि काय. मग Basicवालीचापण आवाज आला. Shoes घालून झोपलो, Hand Gloves घातलेले, तरीही काहीच फायदा झाला नव्हता😝. आमचा आवाज ऐकून रात्रभर थंडीने कुडकुडत जागे राहिलेले तिघे वाटाडेपण बडबडायला सुरु झाले. आता गुहेत झोपलेले आम्हाला उठून मारायच्या आत आम्ही बाहेर निघालो. त्या तिघांनी चूल पेटवली🔥 आणि आम्ही शेकायला बसलो. अक्षतापण उठून आली. आता आमच्या आवाजाने बाहेर झोपलेले सगळे हळुहळु उठायला लागले होते. आणि त्यांना चक्कं गरम होत होतं म्हणे😓. इतक्यात प्रणोतीने वर आकाशात सूर्योदयाआधीच्या तयार झालेल्या रंगछटा दाखवल्या. मी आणि पराजक्ता उठलोच लगेच चुलीजवळून. आता माझंही blanket अंगावर घेऊन झोपता येईल या खुशीत अक्षता पुन्हा गुहेत जाऊन झोपली😄 आणि घोरायला सुद्धा लागलेली😴.
                

              इकडे मी आणि पराजक्ता सरळ गुहेच्या वरच्या भागावर गेलो आणि समोर कळसुबाई, कात्राबाई, रतनगड यांच्या मागे दिसणारी ती रंगछटा बघत बसलो. silhouette च होतं ते. 😶😶 बराच वेळ आम्ही फक्त शांतपणे ते एकटक बघत होतो. खूप वेगळा अनुभव होता तो. 😍😍निसर्गाचं ते देखणं रुप या डोळ्यांनी कधीच पाहिलं नव्हतं आणि अंतःकरणाने अनुभवलं नव्हतं. हळुहळु आता सगळे वर यायला सुरुवात झाली होती. आम्ही आपली Balcony ची जागा पकडून बसलो होतो. बराच वेळ झाला पण सूर्य बाहेर यायची काही चिन्हं दिसत नव्हती पण आता आधी दिसत असलेली गडद रंगछटा फिकी होत चालली होती. आणि सगळीकडे खचाखच 📷photo click होत होते. मधेच Northern lights मध्ये silhouette Click करायला सुरुवात झाली आणि नेमका माझ्यावेळी चिन्मय चा Phone ❗️ dead झाला. आता चांगलंच उजाडलं पण 🌞सूर्यदेव काही तोंड दाखवेनात. 





              आम्ही इकडे बसून बसून याचा अंदाज लावत होतो 🤔तो कुठून वर येणार. कळसुबाई च्या मागून कि दुसऱ्या डोंगरामागून. इतक्यात 😃त्या दोन्हीमध्ये असलेल्या V कडे आमचं लक्षं गेलं, आणि लहानपणी चित्रात काढलेला निसर्ग आठवला. 🌄 ज्यात झाडून आपण सगळेच २ डोंगरांमधून सूर्य उगवताना दाखवायचो. मग सगळ्यांनीच त्याला तिथूनच वर ये अशी विनवणी केली. त्याने देखील ती ऐकली असावी बहुतेक. मग 🌋🌋लाव्हारस जसा भेगाभेगात पसरतो अगदी तसाच नारंगी रंग आता हळूहळू आकाशात भेगाभेगात पसरताना दिसला. आणि एकदाचं त्याने डोकं बाहेर काढलं. त्यानंतर इतक्या सरसर तो वर आला कि काही सेकंदातच त्याची किरणं सरळ डोळ्यांवर यायला लागली आणि आपोआपच नजरा खाली झुकल्या😌. जवळपास १ तासापेक्षा जास्त वेळ झालेला 👀आम्ही त्याची वाट पाहत बसलेलो. पण जे काही या डोळ्यांनी पाहिलं होतं त्याचं वर्णन शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. कारण या गोष्टी फक्तं FEEL करता येतात. यापेक्षा अधिक सुंदर गोष्ट मी आजपर्यंत पाहिली नव्हती. 😍😍डोळ्यांचं पारणं फिटणं हे फक्तं ऐकलं होतं, त्यादिवशी ते प्रत्यक्षात अनुभवलं. PUURRRE JOOOYYY!!! I was smiling like a crazy person.😄 I had A BIG FAT smile on my face. It literally filled my heart💖 with pure joy. One cannot describe it in words, you gotta just feel it in your heart.😊 





           तीच भली मोठी 😊 smile तोंडावर घेऊन आम्ही खाली उतरलो आणि मग पुन्हा Tent मध्ये बसून photography सुरु झाली. इकडे Food Team ने चहा आणि maggie बनवायला सुरुवात केलेली. बाकीचे सगळे निघाले पाण्याच्या टाक्याकडे. दात घासून, 😖बर्फासारख्या थंड पाण्याने तोंड धुवून सगळे परतले. रात्रीच्या राहिलेल्या भाजीमध्येच maggie बनवली होती. 😜 त्यामुळे अक्षरशः VEG MAGGIE खाल्ली. 😋 मस्त लागत होती आणि त्यात करपलेली MAGGIE तर विचारुच नका. नाश्ता झाला, Pittu पाठीला अडकवली आणि निघालो कुलंग फिरायला.





                सगळ्यात आधी पडक्या वास्तू पहिल्या. तिथे थोडं Photo Session झालं. मग निघालो Top Most पॉईंट कडे. जाता जाता एक दगड दिसला. स्फटिकासारखा आणि तोही काळ्या दगडाच्या मधोमध. आपला सह्याद्री कसा तयार झाला हा एक अभ्यासाचा विषय आहे. असो. वर पोहोचलो आणि तिथून दिसणारं अप्रतिम दृष्य सगळे आपल्या Camera मध्ये टिपायला लागले. समोर दिसत होता तो C च्या आकाराचा लांबवर पसरलेला अलंग, डावीकडे मदन चा तो traverse, ज्यावरून आम्ही आलो होतो. आणि मागे कळसुबाई, कात्राबाई, रतनगड अशी रांग. 




                 फिरत फिरत थोडं खाली आलो आणखी ४-५ पाण्याची टाकी होती तिथे पोहोचलो. टाक्यांच्या थोडं पुढे एक छोटंसं Dam च्या भिंतीसारखं construction होतं. आणि त्या भिंतीमध्ये मधोमध एक खिडकी होती. पुन्हा एकदा त्या काळच्या प्रगत स्थापत्य शास्त्राचा प्रत्यय आला. 📷आम्ही फोटोसाठी बसलेलो असताना चिन्मय त्या भिंतीमागे 🤔काय आहे हे बघण्यासाठी गेला आणि मग Basic वाली पराजक्ता गेली मग मी मग हळूहळू सगळेच तिथे गेलो. तिथे गेल्यावर चिन्मय आणि पराजक्ताला दिसले ते अवशेष. तिथे एक दगडी पन्हाळी होती, कमान होती आणि एक तुटलेलं गोमुख होतं. लगेच ते गोमुख उचलून सरांनी आणि टीम ने बसवून बघितलं. गहाळ झालेले अवशेष शोधायचा देखील प्रयत्न झाला. या सगळ्याचा असा अंदाज बांधण्यात आला कि हे देवपूजेसाठी वगैरे असलेली जागा असू शकते (अंदाज आहे हा). नंतर ते गोमुख चिन्मय ने एका व्ययस्थित जागी उचलून ठेवलं, जेणेकरून कोणी त्याची अजून वाट लावू नये. मन एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर घेऊन आम्ही पुन्हा गुहेकडे निघालो🚶🏾. 



               गुहेत पोहचून Bags आवरल्या. प्रणोतीकडून Instructions मिळाले आणि आम्ही निघालो. पुन्हा एकदा समोर आल्या त्या सुंदर अश्या न संपणाऱ्या पायऱ्या😓. आमच्या आधीच Trek ३६५ group ने पण उतरायला सुरुवात केलेली. त्यामुळे थोडं Traffic Jam पण झालं होतं. पायऱ्या उतरलो, दोन फाटे फुटलेले तिथून कुंलंगवाडीची वाट पकडली आणि सुटलो. 
               आता उतरताना पुन्हा रस्त्यात भरपूर 🌳 झाडं होती. वाकून जावं लागत होतं. एका ठिकाणी खूप उतार होता आणि नुसती लाल माती होती. त्यावरून घसरत, सांभाळत, झाडांना पकडत येताना 😝😆खतरनाक मजा आली. काहीजण तर बसूनच आले घसरत. वाटेत फाटे खूप फुटत होते त्यामुळे सगळ्यांना gap न पडू देता चालायाला सांगितलं होतं. चालत चालत पुन्हा एका Patch जवळ पोहोचलो. भारीच होता तो उतरायला. आणि त्याच्यापुढे लागलेल्या पायऱ्या सुद्धा. मी अक्षतासाठी थांबलेले पण दिनेश सरांनी मला पुढे जायला सांगितलं आणि 😝अक्षताला हाकलतंच खाली आणलं. त्याच रस्त्यात मला एक खुउउउउउउउप मोठ्ठ झाड दिसलं. मी झाडाजवळ सरांना त्याच वय विचारायला थांबले. सर म्हंटले चिन्मय ला विचारू मग पुन्हा त्याची वाट बघत थांबलो. तोपर्यंत आम्ही अंदाज बांधला कि असेल 🤔 १००-१५० वर्ष पण चिन्मय म्हंटला साधारण 😝 ५० वर्षेच आहे. पुन्हा चालायला सुरुवात. एक धबधब्याची जागा आली. तिथे ज्यांना पाणी भरायचं त्यांनी पाणी भरलं. तोंडावर पाणी मारलं आणि पुन्हा मार्गस्थ झालो. 



              आता लागलं घनदाट जंगल. आणि नेमकी group मध्ये gap पडली. आणि वाडी जवळ आल्यामुळे जरा जास्तच फाटे फुटत होते. मग आमचं 😯😮एओ ओए 😯😮 सुरु झालं आणि पुढच्यांना एकदाचा संदेश मिळाला थांबण्यासाठी. मागचे आले आणि पुन्हा चालायला सुरुवात. आता मात्र सगळ्यांना आवाज न करता चालायचं होतं कारण आम्ही 🐝🐝 मधमाश्यांच्या Territory मध्ये प्रवेश केलेला. फक्त पावलांचा, पाचोळ्याचा, वाऱ्याचा, वाऱ्याने हलणाऱ्या झाडाच्या पानांचा, पक्ष्यांचा आणि किडयांचा आवाज (हे वाचून नाही कळणार, अनुभवावं लागेल 😁). जंगलातून बाहेर पडलो आणि आवाज पुन्हा सुरु😁. आता शेतं दिसायला लागलेली आणि समोरचा डांबरी रास्ता सुद्धा. पण 🚍 बस काही अजून आली नव्हती. रस्त्याला लागण्याआधी शेताजवळच एक group photo झाला. रस्त्यावर पोहोचलो आणि झाडाखाली सगळे बसले. आता बसल्यावर तोंड कसं गप्पं बसेल. लगेच खाऊ बाहेर आला आणि 😁 चरायला सुरुवात झाली. प्रणोतीच्या सांगण्यावरून कळलं कि आम्ही डॉट ३ तासात खाली उतरलो होतो😎. 






              बस आली आणि आम्हाला आंबेवाडीला घेऊन गेली. लाखन च्या घरी सगळे 😄 fresh झाले आणि अंगणातच जेवायला बसलो. जेवण आटोपलं आणि आम्ही नाशिककरांचा निरोप घेतला. परत येताना कसारा घाटाजवळ बस थांबली ☕️ चहा-कॉफी चा कार्यक्रम झाला आणि आम्ही निघालो. चहा पिऊन सगळ्यांना जोर आलेला त्यामुळे मराठी गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या 🔊. कोण जिंकलं, कोण हरलं माहित नाही पण मजा सगळ्यांनाच आली. गाणी म्हणत म्हणत कल्याण कधी आलं कळलंच नाही. निरोप घ्यायची वेळ आली. आम्ही पुण्याला, पनवेल ला, ठाण्याला, मुंबईला जाणारी मंडळी 😛 In short डोंबिवलीकर सोडून सगळेच. निरोप घेतला आणि कल्याणला उतरलो.👐🏽 खरखरीत झालेले, इथे तिथे खरचटलेले हात आणि 😊आठवणींनी कोरलेलं मन घेऊन प्रत्येकाचा घरट्याकडे परतीचा प्रवास सुरु झाला. 
                
          असा हा AMK चा माझा अनुभव. बरेच नवे मित्र-मैत्रीण add झाले आयुष्यात आणि Facebook वर सुद्धा😜😝. पराजक्ताच्या रूपात माझ्यासारखीच वेडी असलेली मैत्रीणपण भेटली(thewF😜)😘. खूप Magical आणि अविस्मरणीय अनुभव होता हा माझ्यासाठी. आणि तो प्रत्येकाने घ्यावा असं मनापासून वाटतं. 🙏🏾 चला मग. पुन्हा भेट होईलच- आपल्या रांगड्या सह्याद्रीत!!! 😉😊



--समाप्त--


-भारती दळवी. 



Thursday, December 8, 2016

AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ६

AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ६
(बस्स! नाम ही काफी है!)





             अलंग फिरून झाला आणि आम्ही Bags घेऊन निघालो🚶🏾🚶🏾. गुहेत परतत असतानाच काही दुसऱ्या ग्रुपची मंडळी दिसली होती. त्यामुळे आता Patch वर गर्दी असणार Climb करणाऱ्यांची हे नक्की होतं. Technical Team already पुढे गेली होती setup साठी. आम्ही टाक्यातून पाणी भरून घेतलं  कारण आता Direct कुलंगलाच पाणी मिळणार होतं. चालत चालत patch च्या आधी लागणाऱ्या पायऱ्यांजवळ पोहोचलो. पायऱ्यांच्या अलीकडेच बरेच जण थांबले होते. कारण खाली ट्रॅफिक जॅम झालं होतं. मी, अक्षता, आकांक्षा आणि basic वाली पराजक्ता व आणखी काहीजण तिथेच थांबून होतो. प्रणोती आणि मागे असलेली टीम, या गोष्टीचा फायदा घेऊन संजय सरांबरोबर अलंगवरून दिसणाऱ्या मदन च्या पायऱ्या बघून आले😀. 





         
           एकएक करून मग आम्ही उतरायला सुरुवात केली. पहिल्या TURN वर प्रथमेश तर पुढच्या TURN वर संजय सर थांबलेले. ROPE लावलेला होताच. पायऱ्या उतरून PATCH जवळ आलो आणि जितू ने CRAB, ROPE ला TUCK केला. एकीकडे आमचा ग्रुप उतरत होता आणि दुसरीकडून नवीन आलेला ग्रुप चढत होता. सफेद ROPE ला पकडून CENTER ला आले आणि मग जांभळ्या ROPE ला पकडून COMMANDO RAPPELLING करून खाली पोहोचले. संजय सरांनी खाली येऊन पुढचा PATCH उतरण्यासाठी SETUP लावला. तोदेखील PATCH , COMMANDO करतंच खाली उतरलो. केशवलातर टोप खाली न्यायची इतकी घाई झालेली कि तो DIRECT जाऊन टोपातच उतरला😜😝( काहींना कळणार नाही हे). सगळे एक एक करून उतरले आणि मग आम्ही निघालो कुलंगच्या दिशेने.  

       



               पुन्हा तीच छोटी छोटी तोंडावर येणारी झाडं सारत अलंग च्या TRAVERSE वरून त्या TURN वर येऊन पोहोचलो. जिथून उजवीकडे मदनला जाणारा रस्ता आणि सरळ गेलं कि कुलंग ला जाणारा रस्ता आहे. तिथेच LUNCH BREAK घ्यायचं ठरलं. सगळ्यांनी लंच केलं😋 आणि दिनेश सरांनी पुढचे INSTRUCTIONS दिले. कि आता यापुढे सगळे एकामागे एक चालतील🚶🏾🚶🏾, कोणीही मध्ये गॅप ठेऊ नका, OVERTAKE करू नका आणि 🐝मधमाश्या असल्यामुळे शांततेत चाला. जरी एखादी मधमाशी जवळ आली तरी तिला हाकलू नका कारण ती लगेच तिच्या टीम ला बोलवेल.😛😝 आणि स्वतःला COVER करण्यासाठी SCARF वगैरे जे काही असेल ते हाताशी ठेवा.

               एकामागे एक सगळे TRAVERSE वर चालत निघाले. आता उनपण चांगलंच जाणवत होतं ☀️आणि आणि त्या तोंडावर येणाऱ्या झाडांचीसुद्धा आठवण येत होती😜😝 कारण इकडे अजिबातच सावली नव्हती. हळूहळू, सावरत आणि शांततेत सगळे चालत होते. थोड्या वेळाने सगळ्यांना थांबण्यासाठी सांगण्यात आलं✋🏽. आम्ही नेमकं ↩️वळणाच्या अलीकडे थांबलो त्यामुळे पुढे काय चाललंय हे कळायला मार्ग नव्हता. वाटाडे मात्र समोरच्या TRAVERSE वर बसलेले दिसले. आम्ही ते तिकडे कसे पोहोचले हा विचार करत होतो🤔. मधेच जितुसाहेब मागे होते ते पुढे गेले आणि काहीतरी करून परत मागे गेले. एकावेळी एक माणूस जाईल इतक्या जागेत उभं होतो. बसायचीही सोय नाही. आणि वरून ☀️भर दुपारच्या उन्हात 👩🏿 मस्तं खरपूस भाजून निघत होतो. दगडाला हात टेकवून टेकवून हाताला फोड यायचे बाकी होते फक्त, 💥इतका तोपण तापलेला. अशातच मधेच संजय सरांचा जोरात आवाज आला. 😲WATCH OUT!! 😲WATCH OUT!! रे  😲WATCH OUT!! आणि दगड खाली घसरल्याचा आवाज आला. TD उतरत असताना एक LOOSE ROCK खाली घसरला होता. आणि क्षणासाठी मागे असलेल्या आमच्या प्रत्येकाचं मन कुठे कुठे जाऊन आलं हे सांगायची गरज नाहीये😰🤐😜.



               शेवटी रांग पुढे सरकली एकदाची. मग पुढे आल्यावर आम्हाला कळलं कि, का TRAFFIC जॅम झालेलं ते. V च्या आकारासारखं आम्हाला मदनच्या TRAVERSE वरून खाली उतरून, कुलंग च्या TRAVERSE ला वर चढायचं होतं. जितू साहेब पुन्हा पुढे आलेले होते. SCREE असल्यामुळे उतरायला वेळ लागत होता. पुढचा जाईपर्यंत जरा गप्पा झाल्या. मग ROPE ला पकडून हळूहळू उतरलो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढे जाऊन आकांक्षा आणि BASIC😜 वाली ची वाट बघत थांबलो. त्या आल्या आणि आम्ही चालायला सुरुवात केली. पुन्हा एकदा ती झाडं सारत चालायला सुरुवात झाली. नंतर नुसतं चालतोय, चालतोय, चालतोय. कुलंगच्या पायऱ्या यायचं नावाचं नाही घेत. वाटेत थोडं निरीक्षणपण केलं. दगडांचं. २-३ तुकडे खिशात टाकून आणले. 



                चालत चालत एकदाचं पायऱ्यांजवळ पोहोचलो. आणि वर एक कटाक्ष टाकल्यावर दिसल्या त्या पायऱ्याच पायऱ्या🙄😯. आणि या आम्हाला आता चढायच्या होत्या😓. कुलंग खूप मोठा भासत होता तिथून. आता काय करणार, केली सुरुवात चढायला. जेवढी चालताना नाही होत तेवढी हालत पायऱ्या चढताना होते. पण काय त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. 😍😍भारीच. संजय सर असले कि PHOTO निघतातचं😜. पायऱ्यांवर बसून PHOTO काढले. पुन्हा चढायला सुरुवात. आता संपतील मग संपतील, कशाचं काय. 😓संपतच नाहीत. 👃नाकपुड्या MAXIMUM LEVEL पर्यंत फुलत होत्या, इतका दम लागत होता.😜😝 



                कसंबसं पायऱ्या चढून वर पोहोचलो. आधी पोहचलेले सगळेजण गुहेत न जाता पाण्याच्या टाक्यांजवळ पोहचलेले. मुलांचं तिकडे आवरेपर्यंत आम्ही सगळ्या गुहेतंच पडून होतो. मुलं गुहेत आल्यावर 😅 FINALLY आम्हाला टाक्यांवर जायला मार्ग मोकळा झाला. मस्तं तोंड, हात-पाय धुवून FRESH झालो आणि तिथे बसून सूर्याला मावळताना बघितलं. तो रोजंच मावळतो  हो, पण कुलंग वरून पाहिलेला सूर्यास्त वेगळाच!! 😍😍 ते सारं डोळ्यांत भरून घेतलं आणि अंधार पडायला लागला म्हणून गुहेकडे निघालो.



               इकडे FOOD TEAM चं 😋🍵SOUP बनवणं चालू होतं, TECHNICAL TEAM EQUIPMENT COUNT करत होती 1⃣2⃣3⃣ आणि आम्ही थंडीमुळे.झोपायचं कुठे हे ठरवत होतो (जे रात्री झोपेपर्यंत ठरतंच होतं 😝). गुहेत कोणीतरी विंचू पहिला त्यामुळे SLEEPING BAG वाले बाहेरच झोपणार होते. पण आमच्याकडे पर्याय नव्हता. बरं, SOUP होईपर्यंत बाकीचे सगळे जेवणाच्या तयारीला लागले होते. चुलीजवळ बरेचजण बसलेले. मग पापड भाजण्याचा (CUM तळण्याचा😜 ) कार्यक्रम चालू असताना 🎤 गाणी म्हणायला सुरुवात झाली. दिनेश सरांनी एक मस्तं गाणं सांगितलं. 

एकदा एका म्हाताऱ्याचं👴
होतं एकं शेतं.....
 .....................
(मध्ये खूप काही आहे 😛)
चिऊ,चिऊ, काव, काव, विठू, विठू, म्याव, म्याव, भोंव, भोंव, होंची, होंची, एओ एओ चोहीकडे.😄😄  



              जेवण तयार झालं आणि पुन्हा सगळे 🌌चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली जेवायला बसलो. भात, वांगं-बटाट्याचा रस्सा, लोणचं आणि पापड. जेवण आटोपलं आणि सगळे झोपायच्या तयारीला लागले. आमचं अजून, MAT इथून तिथे, तिथून इथे SHIFT करणंच चाललेलं. एकदाचं ठरवलं आणि पडलो. आदल्या रात्री अलंगला पायांना थंडी वाजल्यामुळे झोपमोड झालेली.😖 त्यामुळे SHOES घालुनच झोपण्याचा निर्णय घेतला. पराजक्ता ने तर अलंगलापण SHOES नव्हते काढले पायातून. 🙄आम्ही अजून SETTLE होतोय तोवर अक्षताचं 😴 घोरणंदेखील सुरु झालेलं. उद्या काही करून 🌄 सूर्योदय बघायचा होता. पिट्टू ची उशी करून डोक्याखाली घेतली आणि झोपायचा असफल प्रयत्न सुरु झाला.😴

-भाग-६-
----समाप्त----


-भारती दळवी 

          










Monday, December 5, 2016

AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ५

AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ५
(बस्स! नाम ही काफी है!)




             तर आदल्या रात्री थंडीमुळे पुन्हा एकदा झोपेचं खोबरं झालं. सकाळी सूर्योदय🌄बघायला जायचं ठरलं होतं. पण कशाचं काय. प्रणोती ने जेव्हा आवाज दिला उठण्यासाठी तेव्हा already उशीर झालेला. कोणीच उठलं नव्हतं. फक्त संजय सर सूर्योदय बघायला गेले होते बहुतेकआम्ही अलंगवरचा सूर्योदय miss केला. असो. हळूहळू सगळेच जागे झाले होते आता. अंधार असेपर्यंत प्रातःविधी आवरायला एकएक बाहेर पडले. हळूहळू उजाडलं आणि आम्ही Tooth Brush, Facewash  घेऊन टाक्याकडे गेलो. इतक्या सकाळी सकाळी टाक्यातल्या थंडगार पाण्याने चूळ भरली आणि सण्णकन सगळी इंद्रिय जागी झाली. मग तोंड धुवायला घेतलं आणि आई आई गं. तोंडावर बर्फ फिरवला तरी वाटणार नाही इतकं वाईट थंड वाटलं😖. तेवढं कमी होतं म्हणून त्यात जोरात सुटलेली हवा भर घालत होती. 


    


          
                 food team चहासाठी टोप भरून पाणी घेऊन चाललेली. गुहेत पोहचलो. चहा घेतला. काहींनी (त्यातला एक प्रथमेश) कालचा राहिलेला Bread बाहेर काढलेला संपवण्यासाठी, तो खाल्ला, biscuits खाल्ले. मग Pittu उचलली आणि आम्ही निघालो अलंग फिरायला. थोडं वर चढून गेलो. आता पडक्या वास्तू दिसायला लागल्या. अशाच एका ठिकाणी group photo झाला📷. त्यातपण दुसरा click डावीकडे बघताना. काय माहित काय बघत होतो, ज्याचं त्याला माहित. पुढे निघालो आणि कातळात कोरलेल्या सुंदर अशा ११ पाण्याच्या टाक्यांजवळ पोहोचलो. सगळे सुटलेच. photo साठी. जो तो जाऊन एक-एका spot वर उभा राहिला. मग बसून photo काढण्यात आले. सगळे प्रकार झाले photography चे. ते कधी संपत नाही असंपण. मग प्रणोतीने सर्वांना एकत्र येण्यासाठी सांगितलं, कारण चिन्मय किल्ल्याबद्दलची माहिती देणार होता.  


           
             अलंग, मदन, कुलंग या दुर्गत्रिकुटा पैकी हा एक. भौगोलिक दृष्ट्या या किल्ल्यांच महत्व असं कि, या किल्ल्यांवरून नाशिक-पुणे, नाशिक-नगर अशा विविध व्यापारी मार्गांवर लक्षं ठेवलं जाई. तसंच किल्ल्यावरील टाकं हे शिवकालीन आहे हे कसं ओळखावं हेसुद्धा चिन्मय ने सांगितलं. जर कोरलेल्या टाक्यामध्ये, छिन्नी चे Marks angle मध्ये असतील तर ते शिवकालीन समजावं. तसंच दगडात इतकं मोठं टाकं कमीतकमी वेळात कसं बनवलं जाई याच्यादेखील २ पद्धती त्याने सांगितल्या. मग टाक्यांच बांधकाम आणि पाण्याची natural filtration system कशी आहे, याबद्दल माहिती दिली.



             सुरुवातीचं टाकं हे सगळ्यात जास्तं खोल असतं ज्यामुळे वरून पाण्याबरोबर आलेली माती आणि गाळ खालीच साठून राहावा आणि फक्तं पाणी पुढच्या टाक्यात जावं. अशाप्रकारे प्रत्येक टाक्याची खोली वेगवेगळी आहे. आणि अशा एकूण ४ level होत्या. शेवटच्या टाक्यात जमा होणारं पाणी म्हणजे naturally filter झालेलं पाणी. हे सगळं चालू असताना एलोरा लेणीमधल्या शंकर मंदिराचा विषय निघाला. त्यावर चर्चा सुरु झाली पण वेळेअभावी ती तिथेच थांबवावी लागली आणि आम्ही पुढे निघालो. 





           पडक्या वास्तू बघत बघत चाललेलो असताना एका ठिकाणी पोहोचलो. जिथे आम्हाला सापडली DRAGON GLASS (Whiteवाली)(Only GOT fans will GET it😜😜). ज्याला मिळालं त्याने उचलला आणि खिशात टाकला. topmost point ला जात असताना वाटेत एक दिपमाळ बघितली. पुन्हा निघालो आणि एकदाचं पोहोचलो वर. 







           वर गेल्यावर खडकांवर सगळे बसलो आणि खाली जे दृश्य दिसलं, त्याने आपसुकच "आई शप्पथ!!!" तोंडातून बाहेर पडलं. एकाबाजूला कळसुबाई, दुसरीकडे रतनगड, कात्राबाई, आजोबा अशी रांग आणि सर्वात भारी म्हणजे भंडारदऱ्याचं पाणी.😍😍😍 अहाहा!!! आणि हवेला तर सुमारचं नाहीये तिकडे. जशी कळसुबाई ला हवा लागते तशीच इथेही. अर्थात बाजुबाजुलाच आहेत. पण तरीही. photo session झालं. पण तिथून हलायचं मनंच होईना. प्रणोतीला प्रत्येकाचं नाव घेऊन घेऊन हाकलावं लागलं सगळ्यांना. कारण पुढे नाश्ता करून कुलंगसाठी निघायचं होतं आणि नवीन ग्रुप आल्यावर Patch वर गर्दी होणार होती. 

                      





                   निघालो पुन्हा गुहेकडे🚶🚶. उतरताना एका ठिकाणी खूप सुकलेलं गवत होतं. तिथे प्रणोती, आणि TD घसरगुंडी करत गेले आणि आम्हालापण यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं म्हणून मी आले बसून पण कसलं काय. TD ने जाताना आक्खं गवत झोपवलंच होतं direct😄😝. वरच्या photo मध्ये डाव्याबाजूला दिसतंय का? नुसते दगड टोचले त्यांच्या नादात😂. मग जाताना जरा वेगळ्या रस्त्याने निघालो. त्यामुळे एक पडझड झालेलं शिवमंदिर, शिलालेख आणि एक छोटीशी गुहा देखील दिसली. सारं बघून झालं आणि आम्ही आमच्या निवासस्थानी- गुहेत पोहोचलो. 








           गुहेत Food Team उपमा बनवायला बसली होती. तोपर्यंत बाकीच्यांना bags आवरायला सांगितल्या गेल्या. पुन्हा एकदा गुहेत Photo Session झालं. 😋उपमा खाल्ला, आवरलं, Bags पाठीला लावल्या आणि आम्ही निघालो कुलंग कडे(अजून अलंग चा Patch उतरायचा बाकी आहे हा.)😜 

---------
भाग-५ 
--समाप्त--

भारती दळवी.