Thursday, December 1, 2016

AMK (बस्स! नाम ही काफी है!) - भाग २


AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग २
(बस्स! नाम ही काफी है!)




              बरं. तर आम्ही निघालो AMK कडे🚶🚶. समोरच तीनही किल्ले शेजारी शेजारी उभे दिसत होते.🌞सूर्याची किरणं हळूहळू अलंग वरून मदन आणि पुढे कुलंग वर पसरत चालली होती. जशी जमतील तशी पावलं टाकत सगळे निघाले. चालायला सुरुवात करताच 📷Photography ला सुद्धा सुरुवात झालेली. गप्पा मारत, विचारपूस करत सगळे चालत होते. ३ walky-talky होते एकूण group मध्ये. सर्वात पुढे एक, मध्ये एक, आणि शेवटी एक. आम्ही शेवटी चालत होतो TD सोबत. चढ सुरु झाला आणि आता पायवाटेला सुद्धा फाटे फुटायला लागले होते. अशाच एका ठिकाणी २ फाटे फुटले आणि आम्ही मागची मंडळी(TD, मी, प्रथमेश उर्फ नॅनो😜🚗, अक्षता आणि आकांक्षा) थांबलो. रस्ता कळेना. 😮😯एओ, ओए 😯😮करत होतो पण कोणाला आवाज जाईना. मग TD ने WIRELESS वरून दिनेश सरांशी संपर्क केला आणि मग त्यांनी रस्ता सांगीतला. 


चढ भरपूर असल्यामुळे दम खूप लागत होता. सरांनी दर १० मि. नंतर पाणी प्यायला सांगितलं होतं. सगळे थांबत, ब्रेक घेत चालले होते. जोरात वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज 🌊खळखळत्या पाण्यासारखा भासत होता. जसा काही एखादा ओढा किंवा नदीचं वाहतेय जवळ कुठेतरी.
दिनेश सरांनी डोकं झाकायचा सल्ला दिला. कारण बॉडी हीट बाहेर पडते आणि मग 😪सर्दी होते त्यामुळे. लगेच 👒Cap बॅगमधून बाहेर आली. आणि 👂कानात कापूस घातला गेला😜.



  
                 थांबत थांबत का होईना सगळे Patch पर्यंत पोहोचले. खरंतर पायऱ्या होत्या व्यवस्थित तिथे. पायऱ्यांजवळ आल्यावर संजय सरांनी सांगितलं कि आता अलंग ची गुहा जवळ आलीये. पायऱ्या चढायला सुरुवात केली. एकावेळी एकजण. त्यामुळे एकामागे एक सगळे रांगेत चढत होते. जसं जसं वर चढत होतो तसं तसा वाऱ्याचा वेग वाढायला लागलेला. इतका वेग होता कि आम्ही मागे ढकललो जात होतो. तिथेसुद्धा Photography झालीच काहींची😜😛. एकमेकांना हळू यायला सांगत, इथून ये, तिथून ये करंत, सगळे पायऱ्या चढून, छोटे छोटे Patch चढून गुहेपर्यंत पोहचले😅




                अलंग च्या खालच्या बाजूला असलेल्या गुहेत आपल्या बॅग्स ठेऊन मदन ला जायचं, आणि परत येऊन अलंग ला वर चढायचं आणि तिथे रात्रं काढायची. असा एकंदरीत Plan होता. वर आल्यावर थोडा आराम केला. थोडं खाणं-पिणं झालं. Water Bladder, Lunch, आणि तात्पुरतं लागेल एवढंच सामान घेऊन Pittu पाठीला अडकवली. सगळ्यांच्या bags गुहेत ठेवल्या गेल्या. आणि आमची वारी निघाली मदन च्या दिशेने. 

---------
भाग-२
--समाप्त--
---------

भारती दळवी.


















No comments:

Post a Comment