Friday, August 27, 2021

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-8

सहावा दिवस:

८ फेब्रुवारी २०१७:  Gylpo-bus-chilling , ९ कि.मी, तास.

रात्री कुडकुडत झोपलो.😅 पहाटे मधेच प्रा. ला जाग आली कारण डोक्याजवळ तिला बर्फाचा गोळा लागला. झोपेत तसाच उचलून तो तिने पायाजवळ फेकला.😂 आणि परत झोपली, तो कधी आणि कसा तिकडे आला हे काहीच माहीत नाही.😖 नंतर थंडी सहन होण्यापलीकडे गेली होती. आजही tent ला आतून frosting झालं होतं. 😅सकाळी उठलो, Snowfall चालूच होता. बर्फात जागा शोधत प्रातःविधी उरकले, दात घासण्याची हिम्मत नव्हतीच😂. तशीच चूळ भरून चहा नाष्टा केला आणि १० वाजता बसच्या दिशेने मार्गस्थ झालो. Snowfall चालूच होता. त्यामुळे थांबलो कि थंडी वाजायची म्हणून थांबायची हिम्मत नव्हती🙊. एका तासात बस च्या पॉईंट जवळ पोहचलो. 😂चढ चढून सगळे घसरत, आपटत बसजवळ आले आणि एकच जल्लोष झाला. भांगडा केला, चित्रविचित्र आवाज काढले, फोटो काढले, महाराष्ट्रातल्या फक्त आम्ही दोघीच होतो तरीही गारद द्यायचा मोह आवरला नाही😉. जशी जमेल तशी गारद दिली आणि आपल्या राजाचा सगळ्यांनीच जयघोष केला. आमची बस अजून आली नव्हती त्यामुळे शेकोटीजवळ वाट बघत थांबलो💥. बस आता येईल मग येईल करत १२.३० झाले.🙍 वाटलेलं ट्रेक संपला, पण नाही. नियतीच्या मनात काही भलतंच होतं. आता एका जागी थांबून थंडी सहन होईना झाली. 😓आम्ही चालत राहायचा निर्णय घेतला आणि निघालो आपापल्या स्पीडने. आणि असंच चालत चालत मधेच आमचा chocolates, dry fruits, खजूर चा लंच झाला. सुमारे ३ च्या आसपास आम्ही पहिल्या दिवशी जिथे camp केलेला त्याठिकाणी पोहोचलो😍. वरून ती जागा बघितली आणि क्षणासाठी 💓emotional झालो. ४ दिवसात तिथलं सगळं बदललं होतं. चादर पण तुटली होती😓. इथे आमची पायपीट काही संपेना. शेवटी ४ वाजले तेव्हा कुठे आम्हाला बस घ्यायला आली😐. चढलो बसमध्ये आणि पुन्हा आरडाओरडा.

७ वाजता हॉटेलवर पोहचलो आणि आधी सांगितलं आम्हाला heater द्या रूममध्ये😝. लवकर परतलेले १३ जण बिचारे flight परत cancel झाल्यामुळे हॉटेलवरच होते😂, त्यांना भेटलो. तिथेच दाल-राईस चिकन हानलं. आज रूममधे heater लावलेला त्यामुळे मजाच होती. बॅगमधलं सगळं सामान अस्ताव्यस्त पसरवलं 😂. आणि 😁मस्तपैकी त्या ३ जाड ब्लँकेट च्या थराखाली घुसलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी तब्बल ४ दिवसांनी दात घासले आणि ६ दिवसांनी अंघोळ केली😂. केस धुवायची हिम्मत नव्हती पण धुतले. 🙊उकळतं पाणी द्यायचा हॉटेलवाला पण १० मिनिटात गार. आवरून लेह फिरायला निघालो. आधी BIKE वर फिरायचा plan होता. 😅सोय पण झालेली पण अमर, अमन सोबत आले मग cancel केलं. लेह मार्केट, लेह पॅलेस, शांती स्तुपा, म्युसिअम बघितलं. तिकडची Authentic मटण THUKPA डिश try केली. दातून साहिब गुरुद्वारा मध्ये गेलो. तिथे त्या गल्लीत सगळी ब्रेड ची दुकानं/बेकरी आहेत. तिकडचे ब्रेडपण वेगळे आहेत. तिथेच मी कुत्र्यांना ब्रेड खायला घातले त्यामुळे ते काही पाठ सोडेनात. आणि ते मागे मागे येतायत त्यामुळे प्रा. च्या शिव्या पण खाव्या लागल्या. आणि परत आलो. माझी ११ ला return flight होती त्यामुळे bag pack करत १२ वाजून गेले. दुसऱ्या दिवशी Hall Of Fame, पत्थरसाहिब गुरुद्वारा, झंस्कार-सिंधू नदीचा संगम सगळं फिरून आलो. मस्तं Chinese खाल्लं आणि रूमवर परत. उद्या परत जायचं म्हणून आवरलं. सकाळी ६.३० ला निघायचं होतं. प्रा. ची flight २ दिवसांनी होती. लेहच्या चहूबाजूंना असणारं ते सुंदर जादुई दृश्य डोळ्यात साठवलं. अगदी जीवावर येऊन त्याचा आणि प्रा. चा निरोप घेतला. आणि असंख्य अमूल्य आठवणींच गाठोडं घेऊन माझा Mighty Himalayas ते रांगडा सह्याद्री हा परतीचा प्रवास सुरु झाला.



--समाप्त--














































Thursday, November 16, 2017

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-७

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-७
शेवटची रात्र.




पाचवा दिवस:
७ फेब्रुवारी २०१७:  Tibb-Gylpo , २६ कि.मी, ८ तास.

               तर १२ तास, ४१ किमी चालायचा पराक्रम करून आलो😁आणि जेवण वगैरे उरकून Sleeping bag मध्ये घुसलो. Tibb ला तापमान सगळ्यात खाली गेलेलं.😖 त्या रात्री -४० डिग्री गाठलेलं. मधेच रात्री प्रा. ला वाटलं बाहेर Snowfall चालू आहे म्हणून तिने उठून बाहेर बघितलं पण तसं काहीच नव्हतं😕. आम्ही आधीच ओल्या 
Sleeping bag मध्ये झोपलेलो.😖 रात्री खूपच थंडी वाजायला लागलेली. पहाटे उठल्यावर बघितलं तर tent ला आतून आमच्या श्वाशोच्छ्वासामुळे moisture पकडून frosting झालं होतं. 😮प्रा. च्या पापण्यांवर, भुवयांवर बर्फ जमा झालेला. फोटो काढले आणि परत झोपलो😂. ते ८ वाजताच उठलो. काही दात वगैरे घासायची हिम्मत नव्हती, त्यामुळे नाही घासले😝. चूळ भरलेलीच खूप होती😜. Fresh व्हायला म्हणून Wet Tissue च पाकीट बाहेर काढलं तर त्याचा अक्षरशः दगड झालेला😑. पूर्णपणे गोठलेलं ते. एकही tissue बाहेर नाही खेचता आला. मग काय तसंच आवरलं😛. 
frosting, ओल्या sleeping bag, बर्फ
               चहा-नाश्ता झाला, Bags pack झाल्या आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आज तसं आरामात जायचं होतं पण २६ कि.मी चालायचं होतं. आमचा Gylpo चा Camp, जिथून बसचा Pick-Up point १५ मिनिटांवर राहील अशा ठिकाणी होता (जो कि १ तासावर होता😐). दुपारी १२.३० ला (Tibb च्या आधीची Campsite) Sumdo ला पोहचलो जिथे क्रिकेट खेळलो होतो. रस्त्यात काही Pug Marks सुद्धा दिसले (snow leopard चे वाटलेले पण नंतर कळलं कि ती Mountain goat चे होते😝). Sumdo ला Lunch Break साठी थांबलो. Maggie होती😋. खाऊन पिऊन २ वाजता पुन्हा मार्गस्थ झालो. तासाभराने आमच्या Day-२ वाल्या campsite वर पोहचलो जिथे Football खेळलो होतो. तिथे आम्हाला सह्याद्रीतला गडी श्रीकांत कानवजे भेटला. फोटो बिटो झाले आणि त्याचा निरोप घेऊन पुन्हा निघालो.😛



          😅आता प्रा. मागे बाकीच्यांबरोबर आरामात येत होती आणि मी एकटीच पुढे आलेले. पुढे Guide थांबलेला तिथे मीपण हिची वाट बघत थांबले. तेवढ्यात कड्कड्कड् आवाज आला जोरात😮. Guide म्हंटला वो देखो मॅडमजी चद्दर टूट रहा है! 😱आणि मी अक्षरशः चादर तुटून पाण्यात वाहून जाताना पाहिली. काय आवाज होता म्हणून सांगु. 😘खतरनाक!! आणि तेपण ३ वेळा पाहिली😍. नेमकं कॅमेऱ्यात टिपता नाही आलं, पण नजरेने टिपलं. तेही नसे थोडके. 😅असो. प्रा. ला आल्यावर सांगितलं. ऐकून येडी झालेली. थोडं थांबुन बघितलं पण परत कुठे काही तुटायचं चिन्हं दिसत नव्हतं😂. पुढे रस्त्यात एका Frozen Waterfall जवळ guide आम्हाला घेऊन गेला 😍. दोघीच होतो. फोटोशूट झालं. प्रा. चा गणपती झाला त्याचेपण फोटो काढले😝. पुन्हा मार्गस्थ. आमच्यावेळी जाताना एवढ्या Cracks नव्हत्या दिसल्या पण आज संपूर्ण चादरवर Cracks दिसत होत्या. 😮मधोमध तर धसलेली दिसत होती. चादरची ती अवस्था बघून कळलं कि आता या पुढच्या Groups चा ट्रेक पूर्ण होणं कठीण आहे😟.


धसलेली चादर 
                मोबाईलवर सौम्य आवाजात गाणी चालूच होती. एकदाचं पोहोचलो Campsite वर. ५.१५ वाजलेले. 😃तिथे एक हॉटेलसुद्धा आहे छोटंसं जिथे चहा, कॉफी, दाल-राईस, भुर्जी वगैरे सगळं मिळतं. आमच्या Tent set होत्या. बॅग्स टाकल्या आणि आवरलं, चहा वगैरे झाला. आजपण खुSSSSSप थंडी होती😖. रात्री Campfire जवळ उभं राहून दमशराज खेळत होतो, तसंच socs सुकवायचा कार्यक्रम चाललेला😁. लाकडं ओली असल्यामुळे म्हणावं तशी आग नव्हती आणि त्यामुळे बेक्क्कार थंडी जाणवत होती🙊. जेवायची वेळ झाली आणि आम्हाला जागेवर ताटं मिळाली. मेनू काय होता माहितीये? 😍मटर-पनीर, सोयाबीन, रोटी, दाल-राईस, पापड आणि कस्टर्ड. 😋रॉयल कारभार..😎 जेवण झालं आणि शेकत उभे राहिलो. 

PC: प्राजक्ताताई पराडकर
इथे रात्रीच्या चांदण्यात फेरफटका मारणं स्वप्नवत आहे.
               चादरवर शेवटची रात्रं होती ती😅. त्यामुळे चांदण्यात एक walk तो बनता है!😉 म्हणून मी आणि प्रा. निघालो पण तिला काही जमेना😅. थंडी खुउउप होती. शेवटी ती म्हंटली तू जा, मला नाही enjoy करता येणार आले तरी आणि ती शेकोटीकडे परत फिरली. मी, मलाच ऐकू येईल इतक्या सौम्य आवाजात all time fav. 💓"लग जा गले"💓 लावलं, मोबाईल खिशात ठेवला, आणि 💙चंद्रप्रकाशात, त्या पांढऱ्या शुभ्र चादरवर, शांत वाहणाऱ्या झंस्कार ला न्याहाळत आणि सभोवतालच्या नजाऱ्याला नजरेत साठवत एक फेरी मारली. स्वप्नवत भासत होत सारं. मनात काहीच चालू नव्हतं. हे सगळं बघून एक वेगळीच शांतता होती मनात. 😊मनःशांति म्हणतात ती हीच असावी बहुतेक. ही अशीच चिरंतन रहावी असं खूप वाटलं कारण उद्यापासून पुन्हा त्या धकाधकीच्या जगात परत जाणार होतो. शेकोटीजवळ परत जाऊन सगळ्यांना Good Night केलं आणि आम्ही आमच्या tent मध्ये घुसलो😅. सगळ्यात आधी दोघींचे पाय घासून गरम केले 😂आणि मग त्या ओल्या sleeping bag मध्ये घुसलो😥. त्यातसुद्धा वेळ लागतो normal व्हायला पण ते होईपर्यंत वाSSSट लागते😖. झालं सगळं आणि हळू आवाजात जुनी गाणी ऐकत पापण्या मिटल्या. पण थंडीने लवकर झोपपण कसली लागतेय😂. Tibb ला -४० तर इकडे आज -३० डिग्री तापमान होतं🙊. तसंच कुडकुडत, उद्याचा परतीचा प्रवास रंगवत कधी गुल झालो ते कळलंच नाही.😴 


-क्रमशः-




प्रवासातले आणखी काही photos 


PC: प्राजक्ताताई पराडकर
PC: प्राजक्ताताई पराडकर
२डोळे, नाक, तोंड वाला दगडी चेहरा
PC: प्राजक्ताताई पराडकर
Mountain  goat चे पायाचे ठसे
PC: प्राजक्ताताई पराडकर

Day २ campsite





छोटंसं हॉटेल


----संपले----😂













Monday, June 5, 2017

पर्यावरण संवर्धन- काळाची गरज


           बऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहिण्याची ईच्छा होती. पण काही कारणास्तव नव्हतं जमत. अगदी मागच्या आठवड्यात, जेव्हा Trump बाबा ने नाटकं केली तेव्हाच तीव्र ईच्छा झालेली लिहायची कारण खूप काही सुचत होतं. पण आजचा मुहूर्त चांगला आहे म्हंटलं, कारण आज जागतिक पर्यावरण दिन!!🍀🌎

          असो. आपणासर्वांसाठी एक प्रश्न आहे. आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण काय करतोय?? जे संसारात पडले आहेत आणि जे नाहीयेत त्या सर्वांसाठीच आहे हा प्रश्न. बहुतेक सगळ्यांचंच हे उत्तर असेल कि त्यांना उत्तम शिक्षण देता यावं, त्यांचं आयुष्य घडावं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं म्हणून प्रयत्न करतोय, पैसा वाचवतोय वगैरे, वगैरे. बरं. पण जसं आपण पैसे वाचवतोय तसंच या पिढीसाठी आपण निसर्ग वाचवावा असं  का नाही वाटत? त्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून द्यावं, आणि त्या दृष्टीने पावलं उचलावीत असं का नाही वाटत? Global Warming सारख्या अत्यंत Serious अशा मुद्द्याकडे आपण का नाही लक्ष देत आहोत. त्यावर का कधीच मोठ्या प्रमाणावर चर्चा नाही होत? सरकारने मागच्या वर्षी २ कोटी वृक्षलागवडीचा घाट घातला. रायगडावर लागवड केली. खूप आनंद झालेला उपक्रम बघून. पण नंतर त्याकडे कोणाचंच लक्ष नाही. यातली किती झाडं जगली?😕 असो. तो विषयतर न संपणारा आहे. सरकार आहे ते शेवटी. कोणाचं का असेना. dumping ground च असो किंवा रस्ता झाडल्यानंतरचा पेटवलेला कचरा असो. त्यांची कामे अशीच. मेट्रो-३ साठी कित्येक वर्ष जुनी अशी २२९८ झाडं तोडली😔. प्रोजेक्ट कधीच final झालेला तेव्हाच भरपाई म्हणून लागवडीला सुरुवात करायला पाहिजे होती. पण आता फक्तं आश्वासनं. विकास हा झालाच पाहिजे पण समतोल राखून. नाहीतर विकास करून तो उपभोगायला आयुष्यच राहणार नाही. सरकार करो न करो, मुद्दा हा आहे कि आपल्या भविष्यासाठी आपल्यालाच काय ते करायचंय. त्यामुळे आपापल्या परीने जसं जमेल, जेवढं जमेल तेवढं करायला पाहिजे. आपआपला खारीचा वाटा. कारण आधीच उशीर झालाय त्यात आणखी नको व्हायला. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं म्हंटलं तर, आम्ही जाऊन आलो तो चादर ट्रेक Global warming मुळे बंद व्हायच्या मार्गावर आहे कारण आधीसारखी बर्फाची चादर तयार होत नाही.

          एक साधं उदाहरण घ्या. होळीचं. मला माहितीये अनेकांना हि गोष्टं खटकेल. खासकरून "यांना फक्तं आमचेच सण दिसतात का?" वाला वर्ग. पण नवीन प्रथा रूढ करून आपण आपलं वेगळेपण दाखवून द्यावं असं नाही वाटणार त्यांना आणि पटणारही नाही. असो. तर मुद्दा हा कि, होळीला आपण जी होळी पेटवतो, पूर्वी ती पेटवण्यामागची कारणं वेगळी होती. आणि आता तसं करण्याची तेवढी गरज खरंच आहे का? आणि ती शास्त्रीय कारणं "त्या" वर्गातल्या बऱ्याच लोकांना माहीतही नसतील. असो. तर म्हणायचंय हे कि, सण साजरा करा पण पर्यावरण जपून. कारण आता ती काळाची गरज आहे. प्रत्येक विभागाची, सोसायटीची वेगळी होळी, अगदी राजकीय पक्षांचीसुद्धा!! आणि हल्ली यातसुद्धा स्पर्धा सुरु झालीये. कोणाची सगळ्यात मोठी म्हणून. कशासाठी हे सगळं? बरं. केलं. आता जे नुकसान आपण केलंय पर्यावरणाचं त्याची भरपाई म्हणून एक झाड तरी लावलंय का हो आपण आजपर्यंत? विचार करा, त्या एका दिवशी आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होळी पेटवतो. कधी विचार केलाय किती हानी होतेय फक्त एका दिवसात? दिवाळीचं तर सोडूनच द्या. तो तर वादग्रस्त मुद्दा आहे. फटाके नाही फोडले तर सण कसा साजरा होणार. वरातीत फटाके नाही फोडले तर कदाचित संसार सुखाचा नाही होणार. सामना जिंकल्याचा आनंद फटाक्यातूनच व्यक्त करता येतो आम्हाला. अश्या लोकांच्या टाळक्यात या गोष्टी घुसवणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. 😓 असो. List खूप मोठी होईल लिहायला गेलं तर. जे इतकी वर्षं करत आलोय त्याऐवजी सणाच्या दिवशी जर झाडं लावायचा उपक्रम केला तर? कित्येकांच्या डोक्यातही गेलं असेल माझं बोलणं. पण माझ्यासाठी, माझ्या सारख्या अनेकांसाठी, माणसानेच पाडलेल्या या प्रथा आंधळेपणाने पुढे नेण्याऐवजी पर्यावरण जपणं जास्त महत्वाचं आहे. विजेचा अपव्यय टाळूया. पाण्याचा अपव्यय टाळूया. प्रदूषण जमेल तितकं टाळूया. आणि ज्यांना येणाऱ्या काळातल्या या भयानक संकटाची जाणीवसुद्धा नाहीये त्यांना ती करून देऊयात.

          आपण जेवढं टाळू शकतो तेवढं टाळूया ना! जे नाही टाळू शकत त्याला पर्याय शोधू आणि पर्यायही नसेल तर केलेल्या नुकसानाची भरपाई करू. पण आता जाणून बुजून अजून नुकसान नको. अनेक संस्था आहेत ज्या या चांगल्या कामासाठी राबतायत. जमेल तसं सामील व्हा. 🙋 आम्ही जोडलो गेलोय तुम्हीही जोडले जा. एकदा एक झाड लावून बघा. खरंच खूप वेगळा आनंद आहे त्यात. शेवटचा कधी घातलेला मातीत हात आठवतंय का? नाही ना? या पावसाळ्याच्या आधी करून बघा. खरंच, समाधानाचं स्मितहास्य काय असतं त्याची प्रचिती येईल. बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच. चला तर मग, छोटंसं का होईना, सुरुवात तर करूयात आणि एक पाऊल टाकुयात पर्यावरण संवर्धनाकडे!😊


सध्या थोडक्यात आवरतं घेतलंय😅. लवकरच याच्याबद्दल माहिती देणारा लेख लिहायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत खालील लिंकवर जाऊन Global warming म्हणजेच "जागतिक तापमानवाढ" बद्दल वाचू शकता.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2

धन्यवाद!!!🙏












Friday, June 2, 2017

अभिलाषा

               

               नुकत्याच आमच्या परममैत्रीण प्राजक्ता ताई पराडकर😜😝 यांनी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना काही फोटो पाठवले😍💖. रोहतांग पास चे. ते फोटो पाहून सुचलेल्या काही ओळी. पर्वतरांगा, डोंगररांगा, हिमालय, सह्याद्री आणि आपला प्रिय कोकणकडा यांना सगळ्यांनाच उद्देशून. 


PC: प्राजक्ताताई पराडकर 

अभिलाषा


असामान्य तुझ्या या सौंदर्यावर,
भिरभिरणारीही नजर स्थिरावे.
लुसलुशीत या ढगांपरी,
वाटे, मी ही तुझ्या कुशीत शिरावे.

व्हावे तुझाच एक भाग,
मज, माझे अस्तित्व ना स्मरावे.
विसरुनी जावे माझे "मी" पण,
अन, धुक्यापरी अलगद विरावे.


-स्वछंद. 

PC: प्राजक्ताताई पराडकर