Monday, April 10, 2017

Chadar Trek एक स्वप्नं... भाग-5

Chadar Trek 
एक स्वप्नं... 

भाग-५




तिसरा दिवस:
५ फेब्रुवारी २०१७:  Shingra Koma ते Sumdo, ४.५ कि.मी, २ तास.

             आदल्या रात्री ९.३०-१० वाजताच गुल्ल झालेलो😴. बाहेर रात्रभर Heavy Snowfall चालू होता.😅 आम्हाला ६.३० ला जाग आली. बाहेर अक्षरशः पाण्याचा पाऊस पडतो ना, तसा आवाज येत होता. अर्थात हा पण पाऊसच आहे. पण तरीपण😛. Tent ची zip open केली आणि बाहेर बघितलं. आधी बाहेरूनच Video shoot केलं पण नंतर प्रा. सरळ बाहेरच गेली. ती एकटीच होती आधी बाहेर मग तिने सगळ्यांना 🗣️आवाज देऊन देऊन बाहेर यायला सांगितलं. मी आपलं Fleece ची layer ओली होईल म्हणून आतच बसले😛. बसल्या बसल्या सामान आवरलं. ती आवाज देत होती पण मी नाही गेले.😁

            तिने बाहेर ☃️Snow Man पण बनवला होता. ७.३० च्या दरम्यान जेव्हा Snowfall थांबला तेव्हा मी बाहेर निघाले. Olaf आठवला Frozen मधला त्याला बघून😁. फोटोशूट झालं आणि पुन्हा tent मध्ये आवरायला गेलो. ८.३० चहा-नाश्ता केला. नाश्त्याला शिरा चपाती होती😅. आम्ही जवळपास सगळं संपल्यावरच गेलो होतो. नाश्ता झाला, bottles, Thermos गरम पाण्याने भरून घेतल्या आणि आम्ही निघालो Tibb साठी. यावेळी सुजित मलानी माघारी चालले होते कारण त्यांची return flight होती. 
प्रा. आणि तिचा  SNOWMAN  

                ८.३० वाजता निघालो. आज जास्त चालायचंय हे माहित होतं😅. जवळपास १२-१४ किमी चालायचं होतं. यावेळी DSLR ची Bag आठवणीत check केली मोठ्या bag मधे आहे का ते😂. Snowfall परत सुरु झाला होता. २ तास चाललो,१०.३० ला एका campsite जवळ पोहोचलो. Sumdo, हीच ती जागा जी आदल्या दिवशी निसार ने अजून ३.३० तासावर आहे असं सांगून २ वाजताच camp set केलेला😒. तिथे एक Tibb वरून परत येणारा group भेटला. ते लोक सांगत होते Snowfall मुळे थोडी चादर change झालीये😓. काही ठिकाणी form नाही झालीये वगैरे, वगैरे. एकजण तर म्हणे दगडी पडतायत वरून😂. १०.३० वाजलेले आणि आमचा guide म्हंटला आपण इथेच थांबतोय. त्याची कारणं वेगळीच होती😑. त्यांनी लगेच camp set करायला सुद्धा घेतला. या निर्णयामुळे इकडे ज्यांची ८ ला flight होती त्यांचा trek पूर्ण होणार नव्हता. कारण त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी लेहसाठी निघावं लागणार होतं. ते सगळे almost चिडलेच होते😫. त्यांचं म्हणनं होतं मग उद्या जाण्यापेक्षा आम्ही आताच परत जातो म्हणजे निदान लवकर जाऊन तेवढं लेह तरी फिरता येईल. पण पुन्हा तेच, अर्धे हो तर अर्धे नाही. शेवटी सगळेच थांबले.




Tent समोरचा View 


प्रा. आणि तिची  Snow Fairy
            snowfall ,थांबेपर्यंत वर एका डोंगराच्या आडोश्याला bags ठेऊन थांबलो. Snowfall मुळे पुढे नाही जायचंय असं सांगितलेलं पण एका तासाने snowfall पण बंद झालेला😅. पण इकडे already camp set झाला होता. १२ वाजलेत, आता दिवसभर काय करायचं? 🤔काल तरी खेळायला चांगली ऐसपैस जागा होती. आता काय?  काही नाही. १२.३० ला चहा Biscuit खाल्लं आणि जेवणाची वेळ होईपर्यंत photo-shoot, गाणी न लावताच नाचणे💃, बर्फाचे गोळे फेकून मारणे चालू होतं. 😂प्रा. ने snow मधे झोपून snow-fairy बनवली आणि मग मलापण नाही राहवलं. मज्जा आली👻. खूsssssप. पण हात नसल्यात जमा झालेले😝. नंतर प्रा. ने मला Ice Axe कशी वापरतात त्याबद्दल सांगितलं. सगळं झालं.Bags टाकून tent मधे आवरा आवर केली.






ICE AXE
२ वाजले. जेवण सुद्धा झालं. खिचडी भात होता. जेवून Bowl-Out (क्रिकेटचं Penalty Shootout) खेळायला सुरुवात केली😁. पुन्हा एकदा पंचांची भूमिका प्रा. ने बजावली (जड झालं ना थोडं?😜). अर्धा तास खेळलो पण कालसारखी मजा येईना, bore व्हायला लागलं.  आम्ही हा time pass करत असताना काही जण पुढे चादरवर walk ला गेले होते. 😅आम्हीपण कंटाळून walk ला गेलो. पुढे गेल्यावर कळलं कि आरामात आज पुढे जाऊ शकलो असतो. काहीच Problem नव्हता. असो. आम्ही मग I-Phone मध्ये snowball catch करताना live photos काढले. dive मारताना काढले. २ तास हे सगळं करून कंटाळलो😌. परत येऊन गप्प tent मधे बसलो.
Bowl Out खेळताना

Snowball Catch 
हा नाश्ता झाला. अंधार पडला आणि सगळे campfire जवळ दमशराज खेळायला जमले. ती शेवटची रात्र होती ज्यात सगळेच एकत्र होते😁. कारण दुसऱ्या दिवशी ११ जण परत जाणार होते. खूपच मजा आली. specially "रंगून" 😝आणि "आज का MLA राम अवतार" ह्या movies च्या वेळी😝. रंगून ला तर  विचारूच नका. हसून हसून पार मेलो🤣. कारण राजेश "गु" 💩ची acting करून दाखवत होता 😂आणि त्याला मराठीतून काय बोलतात हे विचारत होता पण मला काय ते सांगता येईना. 😂मी शेवटपर्यंत "शी" च सांगितलं😝. नंतर बऱ्याच जणांनी तो "गु" वाला act बऱ्याच movies साठी Use केला😝. जेवणाची वेळ झाली. आज 😍noodles आणि चक्कं momos होते जेवणात आणि sweet dish शेवया😋. पुन्हा थोडा वेळ Socs सुकवले, खेळलो आणि सगळे झोपायला गेले. आधीच जागेची कमतरता आणि त्यात झोपताना sleeping bag ची chain लावणं म्हणजे कसरत होती😥. आणि त्यात snowfall मुळे त्या ओल्या झाल्या होत्या. तसंच ओल्या bag मधे झोपत होतो कालपासून😅. उद्या Tibb ला पोहचुन मग तिथून परत फिरायचं होतं. खरा trek tibb च्या पुढे नेरक च्या Frozen Waterfall ला गेल्या नंतर पूर्ण होतो पण Already Behind schedule असल्यामुळे तिथपर्यंत आम्हाला नेणारच नव्हते. 😅असो. सगळं आवरलं आणि गाणी लावून उद्याचं स्वप्नं बघत एकदाचं झोपलो. 😴



--क्रमशः--


दिवसभर केलेल्या Time-pass चे आणखी काही Photos 😅





Tent समोरचा View 






-----------