AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ६
(बस्स! नाम ही काफी है!)
अलंग फिरून झाला आणि आम्ही Bags घेऊन निघालो🚶🏾🚶🏾. गुहेत परतत असतानाच काही दुसऱ्या ग्रुपची मंडळी दिसली होती. त्यामुळे आता Patch वर गर्दी असणार Climb करणाऱ्यांची हे नक्की होतं. Technical Team already पुढे गेली होती setup साठी. आम्ही टाक्यातून पाणी भरून घेतलं कारण आता Direct कुलंगलाच पाणी मिळणार होतं. चालत चालत patch च्या आधी लागणाऱ्या पायऱ्यांजवळ पोहोचलो. पायऱ्यांच्या अलीकडेच बरेच जण थांबले होते. कारण खाली ट्रॅफिक जॅम झालं होतं. मी, अक्षता, आकांक्षा आणि basic वाली पराजक्ता व आणखी काहीजण तिथेच थांबून होतो. प्रणोती आणि मागे असलेली टीम, या गोष्टीचा फायदा घेऊन संजय सरांबरोबर अलंगवरून दिसणाऱ्या मदन च्या पायऱ्या बघून आले😀.
एकएक करून मग आम्ही उतरायला सुरुवात केली. पहिल्या TURN वर प्रथमेश तर पुढच्या TURN वर संजय सर थांबलेले. ROPE लावलेला होताच. पायऱ्या उतरून PATCH जवळ आलो आणि जितू ने CRAB, ROPE ला TUCK केला. एकीकडे आमचा ग्रुप उतरत होता आणि दुसरीकडून नवीन आलेला ग्रुप चढत होता. सफेद ROPE ला पकडून CENTER ला आले आणि मग जांभळ्या ROPE ला पकडून COMMANDO RAPPELLING करून खाली पोहोचले. संजय सरांनी खाली येऊन पुढचा PATCH उतरण्यासाठी SETUP लावला. तोदेखील PATCH , COMMANDO करतंच खाली उतरलो. केशवलातर टोप खाली न्यायची इतकी घाई झालेली कि तो DIRECT जाऊन टोपातच उतरला😜😝( काहींना कळणार नाही हे). सगळे एक एक करून उतरले आणि मग आम्ही निघालो कुलंगच्या दिशेने.
पुन्हा तीच छोटी छोटी तोंडावर येणारी झाडं सारत अलंग च्या TRAVERSE वरून त्या TURN वर येऊन पोहोचलो. जिथून उजवीकडे मदनला जाणारा रस्ता आणि सरळ गेलं कि कुलंग ला जाणारा रस्ता आहे. तिथेच LUNCH BREAK घ्यायचं ठरलं. सगळ्यांनी लंच केलं😋 आणि दिनेश सरांनी पुढचे INSTRUCTIONS दिले. कि आता यापुढे सगळे एकामागे एक चालतील🚶🏾🚶🏾, कोणीही मध्ये गॅप ठेऊ नका, OVERTAKE करू नका आणि 🐝मधमाश्या असल्यामुळे शांततेत चाला. जरी एखादी मधमाशी जवळ आली तरी तिला हाकलू नका कारण ती लगेच तिच्या टीम ला बोलवेल.😛😝 आणि स्वतःला COVER करण्यासाठी SCARF वगैरे जे काही असेल ते हाताशी ठेवा.
एकामागे एक सगळे TRAVERSE वर चालत निघाले. आता उनपण चांगलंच जाणवत होतं ☀️आणि आणि त्या तोंडावर येणाऱ्या झाडांचीसुद्धा आठवण येत होती😜😝 कारण इकडे अजिबातच सावली नव्हती. हळूहळू, सावरत आणि शांततेत सगळे चालत होते. थोड्या वेळाने सगळ्यांना थांबण्यासाठी सांगण्यात आलं✋🏽. आम्ही नेमकं ↩️वळणाच्या अलीकडे थांबलो त्यामुळे पुढे काय चाललंय हे कळायला मार्ग नव्हता. वाटाडे मात्र समोरच्या TRAVERSE वर बसलेले दिसले. आम्ही ते तिकडे कसे पोहोचले हा विचार करत होतो🤔. मधेच जितुसाहेब मागे होते ते पुढे गेले आणि काहीतरी करून परत मागे गेले. एकावेळी एक माणूस जाईल इतक्या जागेत उभं होतो. बसायचीही सोय नाही. आणि वरून ☀️भर दुपारच्या उन्हात 👩🏿 मस्तं खरपूस भाजून निघत होतो. दगडाला हात टेकवून टेकवून हाताला फोड यायचे बाकी होते फक्त, 💥इतका तोपण तापलेला. अशातच मधेच संजय सरांचा जोरात आवाज आला. 😲WATCH OUT!! 😲WATCH OUT!! रे 😲WATCH OUT!! आणि दगड खाली घसरल्याचा आवाज आला. TD उतरत असताना एक LOOSE ROCK खाली घसरला होता. आणि क्षणासाठी मागे असलेल्या आमच्या प्रत्येकाचं मन कुठे कुठे जाऊन आलं हे सांगायची गरज नाहीये😰🤐😜.
शेवटी रांग पुढे सरकली एकदाची. मग पुढे आल्यावर आम्हाला कळलं कि, का TRAFFIC जॅम झालेलं ते. V च्या आकारासारखं आम्हाला मदनच्या TRAVERSE वरून खाली उतरून, कुलंग च्या TRAVERSE ला वर चढायचं होतं. जितू साहेब पुन्हा पुढे आलेले होते. SCREE असल्यामुळे उतरायला वेळ लागत होता. पुढचा जाईपर्यंत जरा गप्पा झाल्या. मग ROPE ला पकडून हळूहळू उतरलो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढे जाऊन आकांक्षा आणि BASIC😜 वाली ची वाट बघत थांबलो. त्या आल्या आणि आम्ही चालायला सुरुवात केली. पुन्हा एकदा ती झाडं सारत चालायला सुरुवात झाली. नंतर नुसतं चालतोय, चालतोय, चालतोय. कुलंगच्या पायऱ्या यायचं नावाचं नाही घेत. वाटेत थोडं निरीक्षणपण केलं. दगडांचं. २-३ तुकडे खिशात टाकून आणले.
चालत चालत एकदाचं पायऱ्यांजवळ पोहोचलो. आणि वर एक कटाक्ष टाकल्यावर दिसल्या त्या पायऱ्याच पायऱ्या🙄😯. आणि या आम्हाला आता चढायच्या होत्या😓. कुलंग खूप मोठा भासत होता तिथून. आता काय करणार, केली सुरुवात चढायला. जेवढी चालताना नाही होत तेवढी हालत पायऱ्या चढताना होते. पण काय त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. 😍😍भारीच. संजय सर असले कि PHOTO निघतातचं😜. पायऱ्यांवर बसून PHOTO काढले. पुन्हा चढायला सुरुवात. आता संपतील मग संपतील, कशाचं काय. 😓संपतच नाहीत. 👃नाकपुड्या MAXIMUM LEVEL पर्यंत फुलत होत्या, इतका दम लागत होता.😜😝
कसंबसं पायऱ्या चढून वर पोहोचलो. आधी पोहचलेले सगळेजण गुहेत न जाता पाण्याच्या टाक्यांजवळ पोहचलेले. मुलांचं तिकडे आवरेपर्यंत आम्ही सगळ्या गुहेतंच पडून होतो. मुलं गुहेत आल्यावर 😅 FINALLY आम्हाला टाक्यांवर जायला मार्ग मोकळा झाला. मस्तं तोंड, हात-पाय धुवून FRESH झालो आणि तिथेच बसून सूर्याला मावळताना बघितलं. तो रोजंच मावळतो हो, पण कुलंग वरून पाहिलेला सूर्यास्त वेगळाच!! 😍😍 ते सारं डोळ्यांत भरून घेतलं आणि अंधार पडायला लागला म्हणून गुहेकडे निघालो.
इकडे FOOD TEAM चं 😋🍵SOUP बनवणं चालू होतं, TECHNICAL TEAM EQUIPMENT COUNT करत होती 1⃣2⃣3⃣ आणि आम्ही थंडीमुळे.झोपायचं कुठे हे ठरवत होतो (जे रात्री झोपेपर्यंत ठरतंच होतं 😝). गुहेत कोणीतरी विंचू पहिला त्यामुळे SLEEPING BAG वाले बाहेरच झोपणार होते. पण आमच्याकडे पर्याय नव्हता. बरं, SOUP होईपर्यंत बाकीचे सगळे जेवणाच्या तयारीला लागले होते. चुलीजवळ बरेचजण बसलेले. मग पापड भाजण्याचा (CUM तळण्याचा😜 ) कार्यक्रम चालू असताना 🎤 गाणी म्हणायला सुरुवात झाली. दिनेश सरांनी एक मस्तं गाणं सांगितलं.
एकदा एका म्हाताऱ्याचं👴
होतं एकं शेतं.....
.....................
(मध्ये खूप काही आहे 😛)
चिऊ,चिऊ, काव, काव, विठू, विठू, म्याव, म्याव, भोंव, भोंव, होंची, होंची, एओ एओ चोहीकडे.😄😄
जेवण तयार झालं आणि पुन्हा सगळे 🌌चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली जेवायला बसलो. भात, वांगं-बटाट्याचा रस्सा, लोणचं आणि पापड. जेवण आटोपलं आणि सगळे झोपायच्या तयारीला लागले. आमचं अजून, MAT इथून तिथे, तिथून इथे SHIFT करणंच चाललेलं. एकदाचं ठरवलं आणि पडलो. आदल्या रात्री अलंगला पायांना थंडी वाजल्यामुळे झोपमोड झालेली.😖 त्यामुळे SHOES घालुनच झोपण्याचा निर्णय घेतला. पराजक्ता ने तर अलंगलापण SHOES नव्हते काढले पायातून. 🙄आम्ही अजून SETTLE होतोय तोवर अक्षताचं 😴 घोरणंदेखील सुरु झालेलं. उद्या काही करून 🌄 सूर्योदय बघायचा होता. पिट्टू ची उशी करून डोक्याखाली घेतली आणि झोपायचा असफल प्रयत्न सुरु झाला.😴
-भाग-६-
----समाप्त----
-भारती दळवी










No comments:
Post a Comment