Thursday, February 16, 2017

भरारी



भरारी


आस भरारीची उरी घेऊनी,
अखेर पंख मी पसरले.
घेतला वाऱ्याचा वेग अन्,
अडसर मागे सरले.


साथ कुणाची असो-नसो,
आता संकोच मी विसरले.
भावनांच्या हिंदोळ्यांवरही ,
मनं हे माझे तरले.

ऐकुनी आवाज अंतरीचा, 

विस्मृतीतील स्वप्नं स्मरले. 
आता अशक्य मागे वळणे,
एकंच ध्येयं, स्वतःशी ठरले.

कातं टाकली जुनेपणाने,
अन् स्वप्नं उराशी धरले.
झेपावले आभाळात मन,
आता माझे ना काही उरले .

-स्वछंद.

No comments:

Post a Comment