९० ची पिढी. (90's Kids)
"लहानपण देगा देवा"
"लहानपण देगा देवा"
हे वाक्यं साऱ्यांनीच ऐकलेलं आहे. आणि सगळ्यांनाच पुन्हा लहान व्हावंसं वाटतं. पण आपल्या ९०च्या पिढीचा अनुभवच खूप वेगळा आहे. आपण जे अनुभवलय, जे जगलोय, ते ना आजच्या पिढीच्या नशिबात आहे. ना आपल्या आधीच्या पिढीच्या नशिबात होतं. कधी कधी खूप हरवून जायला होतं. लहानपणीच्या आठवणींत. खूप हवाहवासा वाटतो तो काळ. ९० च्या दशकातला.
प्रत्येकाच्या घरी काही टीव्ही नव्हता त्यामुळे ज्याच्या घरी TV📺 आहे तो राजा, त्याच्या घरात साऱ्या गल्लीतली जत्रा जमायची. सगळा अभ्यास करून झाला कि संध्याकाळी कार्टून बघायला, Duck Tales , Gummy Bears , Ballu (Tale Spin वाला) मोगली आणि बरंच काही 😄. सगळी नावं लिहणं काही शक्य नाही. रात्र झाली कि 👻 मानो या ना मानो, झी हॉरर शो, आहट बघायला गर्दी जमायची. अगदी जवळ जवळ बसून बघायचा TV कारण सगळ्यांची 😰टरकलेली असायची. टीव्हीच्या रिमोट ला हात लावणं म्हणजे फार पराक्रमाची गोष्टं होती आपल्यासाठी. आणि टीव्हीला मुंग्या 🐜🐜 (आपल्याकडे येतात😜) आल्या कि ANTENNA कडे झालेली पळापळ. कसली मजा ए ना. टीव्ही नसण्यापासून कलर टीव्ही पर्यंतचा (आतातर PORTABLE सुद्धा आलाय) प्रवास पाहिला. ROLL वाल्या कॅमेरा पासून सेल्फी पर्यंतचा, BRICK GAME पासून PLAY STATION/XBOX पर्यंतचा, आणि सचिन पासून विराट पर्यंतचा प्रवास पाहिला. काय नाही पाहिलं बदलताना, सगळंच.
सकाळी सकाळी आईने 📻 रेडिओ वर लावलेलं विविधभारती, आकाशवाणी तर आयुष्याचा भागच झालेली जणू . सकाळची सुरुवातच त्याने व्हायची. तयारी करून शाळेसाठी निघणं. शाळेत पोहचायला उशीर झाला आणि राष्ट्रगीत चालू असेल तर ग्राउंडवरंच स्तब्ध उभं राहणं. मग शिक्षकांनी केलेली शिक्षा. अक्ख्या ग्राउंड वरचा आणि वर्गातला कचरा एकमेकांकडे बघून, दात काढत उचलणं. एकमेकांचा डबा भांडून खाणं. मधल्या सुट्टीतली, जेवणाऐवजी असलेली खेळायची घाई. दुसऱ्या तुकडी बरोबर असलेली खुन्नस. शाळा सुटली कि रस्त्यावर लांबवर एकसारखीच दिसणारी गर्दी. सगळं भारी वाटतं आठवल्यावर. पुन्हा एकदा शाळेच्या ग्राऊंडवर जावंस वाटतं. बेंचवर कोरलेली आपल्या अक्ख्या ग्रुप ची नावं बघावीशी वाटतात. आता ते बेंच नसतीलच.पण तरीही.
परीक्षा संपली कि शेवटच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाणं. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांना COIN BOX वरून फोन करणं. TIMEPASS म्हणून मोठ्या भावाबरोबर पेप्सी (१ रु. वाली) विकायला जाणं. भाड्याने सायकल चालवणं (आठ आणे - १५ मि. आणि १रु. - ३० मि.). शाळा कधी एकदाची सुरु होतेय याची वाट पाहणं. सगळंच अनमोल होतं. तेव्हाचा जिव्हाळा, आपलेपणा, निरागसपणा सगळं हरवलेलं दिसतं आत्ताच्या जगात. आता मराठी व्यापार सुद्धा ONLINE खेळला जाईल, समोरासमोर खेळण्याऐवजी. लपाछुपी, क्रिकेट, लगोरी, आंधळी कोशिंबीर (अजूनही कळलं नाहीये कोशिंबीर का म्हणतात ते 😜😂 ), टीपीटीपी टॉप टॉप, डब्बा डबल्सपेस (अजूनसुद्धा या खेळाचं खरं नाव माहिती नाहीये 😂😁, काय वाट्टेल ते बोलायचो😝).

किती लिहू आणि काय लिहू. वेळ आणि जागा दोन्ही कमी पडेल. फक्त एकच गोष्ट करू शकतो आपण. संपर्कात रहा आणि जमेल तेव्हा एकमेकांना भेटा. जुन्या आठवणी तर आहेतच पण आता त्यात नव्या आठवणींची भर घाला. फक्तं १०मि. जरी भेटलात ना तरी पुढचा पूर्ण दिवस चांगला जाईल. कारण ती भेट पुन्हा अशीच त्या जुन्या काळात घेऊन जाईल आणि नकळत ओठांवर हसू येईल 😊😊.

आठवणींच्या जगात हरवताना,
सारं... सारं मनात दाटतं.
नकळत उचलली जाते लेखणी,
अन् मग् लिहावंसं वाटतं.
किती लिहू आणि काय लिहू. वेळ आणि जागा दोन्ही कमी पडेल. फक्त एकच गोष्ट करू शकतो आपण. संपर्कात रहा आणि जमेल तेव्हा एकमेकांना भेटा. जुन्या आठवणी तर आहेतच पण आता त्यात नव्या आठवणींची भर घाला. फक्तं १०मि. जरी भेटलात ना तरी पुढचा पूर्ण दिवस चांगला जाईल. कारण ती भेट पुन्हा अशीच त्या जुन्या काळात घेऊन जाईल आणि नकळत ओठांवर हसू येईल 😊😊.
MISS YOU GUYSS!!! 😘😘😘
STAY IN TOUCH!! 😊😊😊
-भारती दळवी.
-भारती दळवी.

Wah
ReplyDeleteJunya aatavani tajya zalya ....
Dhanyavad
Asach lihi chan chan
Miss u all
Dhanyawad 🙏
DeleteEkdam curect ahe..
ReplyDeleteMisseing u all...
Dhanyawad 🙏
DeleteSundar lekh Bharati. Very well articulated.
ReplyDeleteDhanyawad 🙏
DeleteOffice chya velet asli kam karu nayet ;-P
ReplyDeleteKamat laksh dya
Tu jana tuz kaam kar.. Pall 🏃🏃
Delete1no Bharati 😊
ReplyDeleteDhanyawad 🙏
Delete