भेट स्वतःशी
अशाच एका भटकंती वेळी
निसर्ग मनावर चालून आला,
अन्
माझीच माझ्याशी भेट घालूनी गेला.
म्हणे,
ओळखलंस का हिला ?
तुझ्यातच दडून बसलीये.
पण कधी विचारलसचं नाही तिला.
माहितीये मला तिच्यावाचून
तुझं काहीच नाही अडत,
तीही घुसमटते आतल्या आत,
पण कधीच नाही रडत.
एकदा बाहेर आण तिला,
अन् विचार काय करायचंय?
एकच उत्तर येईल आतून,
जास्तं काही नकोय,
फक्तं मनासारखं जगायचंय,
मनासारखं जगायचंय.
ओलांडूनी चौकट आता,
साखळदंड तोडायचाय.
नकोनं त्याचं त्या जुन्या वाटा,
आता नवीन मार्ग जोडायचाय.
जुन्या आपल्या अस्तित्वाला,जरा नवेपण शिकवायचंय.
अन् जास्तं काही नकोय,
फक्तं मनासारखं जगायचंय.
वाटतं,
पसरावे पंख अन् झेलावं अलगद वाऱ्याला,
रात्रीच्या काळोखात शोधावं ध्रुव ताऱ्याला,
आकाशात रमतानाही जमिनीशी नातं टिकवायचंय,
अन् जास्तं काही नकोय,
फक्तं मनासारखं जगायचंय,


Khup Chan
ReplyDeleteDhanyawad _/\_
Deleteअप्रतिम .... खुपच छान लिहिले आहेस
ReplyDeleteअशीच लिहित जा.
खुप खुप शुभेछा तुझ्या पुढच्या प्रवसासाठी :)
Sheetaal Wamanrao Alhat
Dhanyawad _/\_
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteKeep it up :)
Dhanyawad _/\_
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNisargachya Sanidhyat allyavar khup masta vata sagla kahi ekashant visarun tichyat kayamcha gunga rahaycha ani tya ramya vatavarnat Kayam cha harvun java..
ReplyDeleteExactly!!! खरंच. भारी वाटतं एकदम.
DeleteMasta dear..
ReplyDeleteKeep going on... ��
धन्यवाद!! 😊 करतेय प्रयत्न 😜
Deletejg na mg, kon nko mhntay :-)
ReplyDeleteChal na mg tupn, me jatech a 😜😛
DeleteNice poem bhartii..very well..all the best
ReplyDeleteधन्यवाद!! 😊 करतेय प्रयत्न 😜
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद!! 😊
Delete