AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग 3
(बस्स! नाम ही काफी है!)
चला. तर आम्ही निघालो मदनच्या दिशेने. अलंग च्या traverse वरूनच मदन ला जायचं होतं. मुंग्या जशा चालतात ना🐜🐜, तशी एकामागे एक आमची जत्रा चालत निघाली होती🚶🚶. दिनेश सर, जितू साहेब, हे पुढे जाऊन सगळं climbing च set up ready करणार होते. खूप झाडं होती रस्त्यात. खूपंच. तीही मोठी नाही छोटी छोटी झाडं. जी चालताना तोंडावर येत होती. चालताना हाताने आधी झाडं बाजूला सारून मग चालावं लागत होतं. तशी संपूर्ण वाटेत सावली असल्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही. चालत चालत, आजू बाजूला बघत एका पॉईंटवर पोहोचलो. जिथून सरळ गेलो तर कुलंग ला पोहोचतो आणि मदन ला जाण्यासाठी उजवीकडे वळावं लागतं. मागच्या मंडळींत आणि आमच्यात बरीच gap होती. त्यामुळे थोडा वेळ तिथेच त्यांची वाट बघत थांबलेलो. तेवढ्यात संजय सरांनी एका Group ने तिथून CLIMBING केल्याचं सांगितलं. मग त्यावर थोडी चर्चा झाली. वर बघितलं आणि मनातल्या मनात म्हंटलं, अश्या वेड्या माणसांना नक्कीच भेटायला आवडेल. काय ती जिद्द, काय तो आत्मविश्वास आणि काय ती ताकत💪🏽.
अशाच गप्पा चालू असताना मागची मंडळी दृष्टीक्षेपात 👀 आलेली दिसली आणि आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात मदन चा तो famous असलेला traverse आला. Technical team ने already तिथे rope बांधला होता.
तसा तो traverse इतका काही भयावह नाही जितका तो भासवला जातो. भरपूर जागा आहे तशी पाय ठेवायला. फक्तं Risky आहे थोडा एवढंच. कारण दुसऱ्या बाजूला मस्तं खोलंच खोल दरी आहे. 😰😁 चालत चालत ३०-४० फूट वाल्या मदन च्या Rock Patch पर्यंत पोहाचलो. मागे अजून बरेच जणं यायचे बाकी होते. सगळं ready होतं. वर दिनेश सर, आणि जितू साहेब होते तर खाली संजय सर आणि रचित होते. आधी वाटाड्यांना वर पाठवलं गेलं. तोपर्यंत आमचा चरायचा कार्यक्रम चालू होता. मग हळूहळू आमच्यातला एक-एक जण, ज्याच्याकडे harness आणि 👷helmet आहे, तो Climb करू लागला. आमच्या पैकी बऱ्याच जणांनी आयुष्यात पहिल्यांदाच केलेलं climbing होतं ते. ओमकार पासून सुरुवात झाली बहुतेक, कि उमेश पासून माहित नाही. मग सुनील काकांनी climb केलं. मग सगळ्यांचे Climb करतेवेळीच्या Clicks /photography साठी आनंद ला आधी वर पाठवलं गेलं. क्यूँकी Photo तो बनता है ना BOSS!! आतातर मागची सगळी मंडळी सुद्धा patch जवळ येऊन पोहोचली होती. फक्तं एका व्यक्तीला उभं राहण्यापुरतं जागा होती जेमतेम. Traffic जॅम झालं होतं, म्हणायचं झालं तर. आणि Turn असल्यामुळे मागच्यांनातर माहीतही नव्हतं कि पुढे काय चालू आहे. Waiting वर होते ते सगळे.
एक एक करून Patch चढत होतो. सगळ्यात जास्तं मजा खाली बसून दुसऱ्याची कशी सर्कस होतेय हे बघण्यात येते. जी सगळ्यांनाच आली. फक्तं स्वतःची वेळ आली तेव्हा सगळ्यांचीच ४ ठिकाणी झाली. त्यात माझ्या हेल्मेटची काय दुश्मनी होती माझ्याशी देव जाणे. बसतंच नव्हतं. तसंच डुलतं helmet सावरत Climb केलं. काय मजा आली पण. १ नं.✌🏽🤘🏽 मग वर पोहचल्यावर लक्षात आलं कि माझा hairband मधेच अडकलाय कुठेतरी patch मध्ये🙆🏻. जितू हाकलायच्या मागे होता, पण HairBand घेतल्याशिवाय मी काही तिथून हालत नाही म्हंटल्यावर जितूने शेवटी जयेंद्र ला तो येताना घेऊन यायला सांगितला. इतनी तेज हवा मे उस HairBand कि किमत तुम क्या जानो जितू बाबू 😛😁. BTW धन्यवाद 🙏🏽.
थोडं वर गेलो आणि मग आल्या त्या मदन च्या सुंदर अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या. 😍😍अहाहा. तिथे सुद्धा safety म्हणून rope लावलेला होताच. Rope ला पकडून पायऱ्या चढलो आणि एकदाचं मदन ला Top ला पोहोचलो. गुहेच्या आधीच पाण्याचं टाकं लागतं. आधी जाऊन पाणी भरलं आणि तोंड धुतलं. Crystal Clear होतं ते पाणी. Bisleri च पाणी सुद्धा Fail त्याच्यापुढे. तिथून आवरलं आणि गुहेत जाण्याआधी topmost पॉईंट ला सगळे निघाले. तिकडे जाऊन थोडं photo session झालं. संस्थेच्या banner सोबत group photo झाला. मदन वरून C सारखा दिसणारा अलंग आणि भव्य असा कुलंग पाहिला. मग सगळे गुहेत जेवणासाठी आले. ट्रेक मध्ये कधी खाण्याचे हाल होत नाहीत😜😝. माझं जेवण अक्षता घेऊन आलेली. भाकरी आणि भाजी. पण अजून बरंच काही खाल्लं. गुळपोळी म्हणू नका, अंड ब्रेड म्हणून नका, काय नव्हतं, Bun Maska सुद्धा होता-जेवणात😄.
जेवण आटोपलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. पायऱ्या उतरून Patch जवळ आलो. Patch उतरताना सुद्धा सगळ्यांची तोंडं बघण्यासारखी झालेली😥😰. उमेश ची पण मजा आली. वर उभे राहून सगळेच मजा घेत होते. तिथेपण photo session📷 झालं. एक एक करून सगळे उतरत होते. जो उतरला तो वाटेला लागत होता कारण थांबायला जागा नव्हती आणि लवकरात लवकर अलंग ला पण पोहचायचं होतं. तिथे 👫 प्रणोती आणि चिन्मय आम्हाला join होणार होते. आणि तिथून प्रणोती Trek Leader ची धुरा सांभाळणार होती. आम्हाला अलंग ला पोहचून, Bags घेऊन तिथले २ patch चढून वरच्या गुहेत पोहचायचं होतं. त्यामुळे, सगळे अलंग च्या दिशेने आल्या मार्गी परत निघालो होतो.
भाग-३
--समाप्त--
भारती दळवी








Kya bat hai... Yat tar tu saglyan chi mazza ghet basalis good.. 😉😂😂
ReplyDeletearey mhanje kay
ReplyDeletekhatarnaak mja aali 😂😂