Saturday, December 3, 2016

AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ४


AMK (अलंग, मदन, कुलंग)-भाग ४
(बस्स! नाम ही काफी है!)



             तर, परत येऊन आता आम्ही अलंग ला खालच्या गुहेत पोहोचलो. 👫प्रणोती आणि चिन्मय (उर्फ मंदार, उर्फ चैतन्य, उर्फ कैवल्य😜😝) आधीच तिथे पोहचले होते. संजय सरांना Trek Leader च्या जबाबदारीतून मुक्त करत प्रणोतीने धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आणि पुढचा प्लॅन सांगितला. त्याप्रमाणे सगळ्यांच्या Bags गुहेतून बाहेर काढण्यात आल्या. काय ती आवराआवर केली आणि सगळे ready झालो. गुहेशेजारीच एक छोटा Patch आहे जवळपास २५ फुटाचा. तो चढून गेल्यावर नंतर येतो तो मोठा Patch, जवळपास ५०-७० फुटाचा(नक्की किती ते माहित नाही). 


           पहिला Patch चढून दिनेश सर, जितू साहेब पुढचा set up ready करायला गेले. संजय सर Patch संपतो तिथे वर थांबले आणि रचित खाली. वाटाड्यांना आधी बॅग घेऊन वर पाठवलं गेलं. मग bag घेऊन चढायला वेळ लागतो हे पाहिल्यावर सरांनी Bags आधी पाठवायला सांगितल्या. जवळपास सगळ्यांच्या bags वर गेल्या आणि मग आम्ही चढायला लागलो. जास्तं कठीण नव्हता तसा तो patch. Rope ला पकडून फक्तं सरसर चढायचं होतं. वर तर पायऱ्याच होत्या अशापण. आणि खरी परीक्षा तर पुढे होती😂😝. एकएक करून प्रत्येकजण चढू लागला आणि आपापली bag उचलून मोठ्या Patch जवळ येऊन थांबू लागला. तोपर्यंत Setup ready होत आलेला. आम्ही खाली बसून फक्तं बघायचं आणि photo काढायचं काम करत होतो. 

          थोड्या वेळाने दिनेश सरांचा आवाज आला. Harness घालून Ready आहेत त्यांनी सुरु करा चला. पण कोणीच हालत नव्हतं जागेवरून. काहींकडे तर HARNESS देखील नव्हते कारण खालचा Patch चढणार्यांना ते परत दिले होते.
शेवटी सरांनी वैतागून Bags आधी पाठवायला सांगितल्या😛. खाली २ टीम तयार केलेल्या, Rope खेचण्यासाठी. १, २, आणि ३ नाहीच Direct GOOO!!. आपली Basic वाली (पराजक्ता), तिने अडकलेला rope वर चढून काढला. तिला सरांनी bags ला गाठ मारून वर पाठवायचं काम दिलं. रचित आणि संजय सर खालच्या Patch वरच होते कारण. मग फाट्यांचा भारा (लाकडांची मोळी) बांधून वर पाठवली गेली. हे सगळं चाललेलं असताना खाली गोंधळपण तेवढाच चाललेला. नशीब तरी फक्तं आपलाच group होता त्यादिवशी😌. वरून दिनेश सर आपले ओरडतायत कि केशव आणि खेचणारी टीम सोडून मला कोणीच इथं नकोय आणि कोणाचा आवाज पण नकोय. पण तरीही सगळे आपल्याच नादात.😛

          Finally चढायला सुरुवात झाली. वाटाड्यांना आधी वर पाठवलं. मग food team ला आधी पाठवायचं होतं, त्यामुळे उमेश चढला. १,२, GOOO.. धडपडत धडपडत..  १,२, GOOO.. आणि मग आली देवेंद्र ची वेळ. आता सुद्धा मला हसायला येतंय😝😝😝. बिचारा देवेंद्र, त्याची पार वाट लावली. टोलवतंच नेला त्याला. त्याचं आणि GOOO टीम च काही जमलं नाही. तो बिचारा एक-दोन फुटावरचा Hold बघायचा आणि हे त्याला Direct ४ फूट वर उडवायचे. त्याचा जीव वर आपटून आपटून चाललेला आणि आमचा जीव खाली हसून हसून चाललेला😂😂. किती ठिकाणी खरचटलं काय माहित. 



          food टीम मध्ये असल्यामुळे मी आणि अक्षता आता जाणार होतो. प्रणोतीने Harness check केला. रचित ने Rope ला Tuck केलं आणि झाली सुरुवात चढायला. नुसतं Climb करायची खूप इच्छा होती पण वेळेअभावी ते शक्य नव्हतं. सुरुवातीला माझं GOOO team बरोबर व्यवस्थित Tunning जमलेलं पण नंतर हाताला जाणवायला लागलं Rope चं अस्तित्व. काही सेकन्द थांबून मग पुन्हा Pull केलं आणि वर पोहोचले. शेजारच्या छोट्या गुहेत bags ठेवल्या होत्या. उमेश ने दिनेश सरांना मालपोहा दिला, त्यातच आम्हीपण हात मारून घेतला. मागून प्रणोती आली. मग प्रणोती ने मला Tape Sling बांधली आणि Bag पाठीला लावून पुढचा प्रवास सुरु झाला. तोपर्यंत अक्षतापण आली होती. उमेश, देवेंद्र, मी आणि  जितू निघालो. जितू आम्हाला सोडून परत जाणार होता. पुढच्या पायऱ्या बेक्क्क्कार 😌😌 होत्या. खतरनाक एकदम. एकावेळी एकजण जाईल इतकीच जागा. Rope ला पकडून पकडून, Bag सांभाळत वर पोहोचलो. अक्षता तिथून एकटी कशी आली हे तीचं तिलाच माहीत. वर जाऊन जो सूर्यास्त पहिला, त्याने सगळं विसरायला झालं. ३ वाटाडे, आणि आम्ही तिघं. एवढेच जण त्यावेळेत वर पोहोचलो. मग अक्षता आली आणि एकएक करून सगळे हळूहळू यायला लागले. तरी बराच वेळ लागत होता.     




      आपली basic वाल्या  पराजक्ता ला नंतर अंधारात बाकीचे कसे चढले हे विचारलं. त्यावर ती म्हणाली, अंधार झालेला त्यामुळे कसले holds आणि कसलं काय. जिथे पाय लागला तिथे ठेवला. सर आणि रचित head torch ने दाखवत होते पण काही कळायला मार्ग नव्हता. हळूहळू आपल्या स्पीड ने चढावं म्हंटल तर सगळ्यांनाच ४फूट वर पोहोचवलं जात होतं😂(पण खरंच GOOO टीम चं कौतुक व्हायलाच पाहिजे-कारण rope ने हातांची काय वाट लागते हे आपल्याला माहितीये. -धन्यवाद🙏👏👏). बरं, आधी आपण मग मागून bag. असं एकंदरीत चाललं होतं. वर जास्तं जागा नसल्यामुळे 2-3 जण झाले कि प्रणोति त्यांना anchor करून पुढे पाठवत होती. भेटेल ती bag उचलून आणल्यामुळे कोणाकडेच torch नव्हती. 
अंधारात आपण रात्री काय चढून आलोय हे त्यांना दुसऱ्या दिवशी समजलं. 😁😌

               इकडे उमेश च्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गुहेत न जाता पाण्याच्या टाक्याजवळचं जेवणासाठी थांबायचं ठरवलं. अंधार पडला होता त्यामुळे torch बाहेर काढल्या आणि जो येईल त्याला torch काढायला सांगितल्या. माझ्या बॅगमधून चहाचं सामान बाहेर काढलं. अक्षता काय माहित कोणाची bag उचलून घेऊन आलेली. तयारीला लागलो आणि समजलं कि २ पैकी १ टोप फुटका आहे. मग सगळं एकाच टोपात करायचं ठरलं. वाटाड्यांनी चूल पेटवून, लाकडं जमा करून ते सरांना मदत करायला निघून गेले. 



                आमचा चहा तयार झालेला. इतका चहा होता कि अजून 3 group चा पिऊन उरला असता.😝😝 आम्ही जो येईल त्याला चहा Offer करत होतो😁. आणि आल्या आल्या चहा मिळाला म्हणून आम्हाला आशीर्वाद मिळत होते. एकीकडे सगळे जेवणाच्या तयारीला लागले होते. झाडून सगळ्यांनी मदत केली. कोण कांदा कापतंय, बटाटा कापतंय, फ्लॉवर कापतंय, सगळेच सगळं करत होते. सगळं ready झालं पण एक टोप फुटका होता. मग आता काय? चहाची मंडळी अजून बाकी होती आणि जेवण पण बनवायचंय. मग केला गेला तो जुगाड. आपण भारतीय असेपण जुगाडुच आहोत. राखेचा लेप लावला टोपाला आणि फुटलेल्या जागी आतून बटाटा चिटकावला. झाला problem solve. चहा त्या टोपात काढला. तेल,जिरं, मोहरी,कांदा,मसाला, जे जे होतं ते ते टाकलं. चारही बाजूने सल्ले येत होते. किती काय टाकावं याबद्दल. सगळ्यांच्या सल्ल्याची चव उतरलेली त्यात.  Actually त्यामुळेच जास्तं चव आलेली भाताला😜. 


             आमचं जेवणही बनवून झालं तरी technical team आणि leader आले नव्हते. बऱ्याच वेळाने एकदाचे आले. त्यांना चहा दिला. आल्या आल्या त्यांनी वाटेत एक फोडसा साप बघितल्याची खबर दिली आणि आजूबाजूला नीट बघून बसायला सांगितलं. लगेच सगळ्यांनी torch मारून आजूबाजूला बघितलं😜. प्रणोतीला वाटलेलं कि जेवण व्हायचंय अजून म्हणून तिने तयारीचं विचारलं. जेवण ready आहे समजल्यावर तिला धक्का बसला. सुखद धक्का! 😛 पापड भाजून झाले आणि सगळे जेवायला बसले. वर चांदण्या, समोर चूल, खाली गवत, थोडासाच प्रकाश, आणि आपल्यासारखी वेडी माणसं, या सगळ्यात जेवायची मजा काही औरच आहे. 

            जेवण आटोपलं, भांडी घासून झाली आणि सगळे निघाले गुहेकडे. संजय सरांनी मुलींसाठी वेगळ्या रूमची सोय करून ठेवलेली. भारीच होती रूम. 😊Bags टाकल्या, mat टाकली आणि झोपायची तयारी केली😴😴.उद्या उठून सूर्योदय बघायचा असं ठरलं. त्यामुळे पहाटे ५ वा. उठायचं होतं. आदल्या रात्री लाखन च्या अंगणात थंडीमुळे झोप झाली नव्हती. गुहेत त्या मानाने उबदार वाटंत होतं. पण ते सुद्धा रात्री २ वा. पर्यंतच वाटलं😂. नंतर पायांना थंडी वाजायला लागली आणि झोपमोड झाली. अक्षता आणि आकांक्षा घोरत होत्या. मी जागीच होते आणि दुसऱ्या दिवशी कळलं कि basicवाली😜 पराजक्ता पण जागीच होती.
नुसतंच या कुशीवरुन त्या कुशीवर. आपकी कसम च्या गाण्यासारखं करवटें बदलते रहे हम तो रातभर.... असो. उद्या काय होतंय ते पुढच्या भागात बघू. 😁😛


                                                       भाग-४
                                                     --समाप्त--

                                                   भारती दळवी.
















2 comments:

  1. Nice one Bharati ! Eagerly awaiting bhaag 5 , was referred to your blog by "basic wali ' Prajakta ! Keep trekking , keep writing !!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank You Prashant!! Mla bolli ti kal.. Bhaag 5 aaj yeil.. ani Parajakta re Prajakta nahi 😜😜

      Delete